अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे अल्पसंख्यांक महिलांसाठी नेतृत्व विकासासाठी नयी रोशनी योजना

Posted On: 21 MAR 2022 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2022

अल्पसंख्यांक महिलांना ज्ञान, साधने आणि आणि नेतृत्व करता यावे यासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे  नयी रोशनी या योजनेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम म्हणजे 18 वर्षे ते 65 वयोगटातील अल्पसंख्याक महिलांसाठी सहा दिवसांचा अनिवासी / पाच दिवस निवासी प्रशिक्षण  कार्यक्रम आहे. महिलांसाठी असलेल्या या प्रशिक्षण उपक्रमात आरोग्य आणि स्वच्छता, महिलांचे कायदेशीर अधिकार, आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, स्वच्छ भारत, जीवन कौशल्य आणि सामाजिक आणि वर्तनात्मक बदलांसाठी उपयुक्त माहिती दिली जाते.या कार्यक्रमांशी संबंधित प्रशिक्षण,कार्यक्रम अंमलबजावणी  संस्था/ गैर सरकारी संस्था यांच्याद्वारे दिले जाते,ज्या सर्व लाभार्थींना प्रशिक्षण संपल्यावर देखील
12 महिन्यांच्या कालावधीपर्यंत  आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सर्व प्रकारची मदत करतात
अल्पसंख्याक महिलांच्या नेतृत्व विकासासाठी असलेल्या नयी रोशनी या योजनेअंतर्गत  2014-15 2020-21 याकाळात  94.00 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी आणि रु.85.83 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
अल्पसंख्याक स्त्रियांच्या नेतृत्व विकास- नई रोशनी या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या  स्वयंसेवी संस्थांना दिल्या गेलेल्या निधीचे राज्यवार वितरण पुढील सारणीत दिले आहे.
निवडलेल्या स्वयंसेवी संस्थांची निवड ही उत्तम  प्रकारे पारख करून केली जात असून निवड झालेल्या स्वयंसेवी संस्था या उच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या, स्त्रियांच्या कल्याणासाठी समर्पित आणि वचनबद्ध असल्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे. योजनेसाठी निवड   झालेल्या  स्वयंसेवी संस्थेकडे नोंदणीकृत कार्यालय असले पाहिजे आणि केवळ महिलांच्या विकासासाठी असा किमान एक तरी प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला असावा. प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या पीआयए / एनजीओज कडे अनिवार्य पात्रता आणि आवश्यक सुविधा असणे अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे. अशा सर्व स्वयंसेवी संस्थांचा मंत्रालयाच्या मंजुरी समितीने  विचार केला आहे.
योजनेशी संबंधित इतर तपशीलवार माहिती पुढील संकेतस्थळावरउपलब्ध आहे.
http://nairoshni-moma.gov.in

 

States/Union Territories

Number of NGOs

Andhra Pradesh

9

Arunachal Pradesh

2

Assam

29

Bihar

12

Delhi

9

Gujarat

2

Haryana

7

Himachal Pradesh

1

Jammu and Kashmir

13

Jharkhand

9

Karnataka

13

Kerala

4

Madhya Pradesh

76

Maharashtra

14

Meghalaya

1

Nagaland

3

Orissa

6

Punjab

11

Rajasthan

23

Sikkim

1

Tamil Nadu

10

Uttar Pradesh

318

Uttarakhand

15

West Bengal

14

Chhattisgarh

4

Telangana

3

Total

609


ही माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री श्री.मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807925) Visitor Counter : 257


Read this release in: English , Urdu