गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध-अमित शाह

Posted On: 18 MAR 2022 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील, केंद्र सरकार जम्मू काश्मीरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. अमित शाह यांच्या हस्ते, आज जम्मू काश्मीर पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर ह्या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

त्यानंतर अमित शाह यांनी या कुटुंबीयांशी संवादही साधला. जम्मू काश्मीर पोलिस सेवेतील या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचा सर्व देशाला अभिमान आहे, असे अमित शाह म्हणाले. अमित शाह सध्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत.

अनेक ठिकाणी, विविध प्रसंगात, जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यात, या पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतूक केले.

  

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807201) Visitor Counter : 236


Read this release in: English , Hindi , Urdu , Bengali