संरक्षण मंत्रालय
ब्राझीलच्या शिष्टमंडळाची वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाला भेट
Posted On:
17 MAR 2022 10:30PM by PIB Mumbai
ब्राझीलचे विशेष सचिव (सामरिक व्यवहार), प्रेसीडेंसी आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अॅडमिरल फ्लेव्हियो ऑगस्टो वियाना रोचा यांच्या नेतृत्वाअंतर्गत ब्राझीलच्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळाने पश्चिम नौदलाच्या मुख्यालयाला,17 मार्च 2022 रोजी भेट दिली.
या भेटीदरम्यान ॲडमिरल रोचा यांनी पीव्हीएसएम,एव्हीएसएम,व्हीएस एम,एडीसी,फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांच्याशी संवाद साधला. दोन्ही ॲडमिरल्सनी परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांसह सागरी क्षेत्रातील आव्हाने आणि धोके कमी करण्याच्या धोरणांवर चर्चा केली.
एफओसी-इन-सी (पश्चिम) यांनी माननीय पंतप्रधानांच्या सागरी-सुरक्षा आणि प्रदेशातील सर्वांगीण विकास - भारतीय नौदलाचा सागरी दृष्टीकोन चर्चेदरम्यान समोर आणला आणि ब्राझीलच्या नौदलाची जहाजे, जेव्हा हिंदी महासागरी क्षेत्रात तैनात केली जातात त्यावेळी ती भारतीय बंदरांना भेट देऊ शकतील असे सुचवले.
मायदेशातील बंदरांपासून दीर्घ कालावधीसाठी दूरवर तैनात केलेल्या युनिट्सना भारतीय बंदरे (शिपयार्ड्स)तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी सुसज्ज आहेत,असेही त्यांना सुचविण्यात आले
विशेष सचिवांनी औपचारिक माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आणि दोन्ही नौदलांमधील परस्परसंवादासाठी अधिक वेळा भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
***
SP/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807134)
Visitor Counter : 209