Posted On:
16 MAR 2022 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2022
मंत्रालयाने परिपत्रक क्र. नुसार ब्लॅकस्पॉट (अपघाती जागा) लक्षात येण्यासाठी दिनांक 28.10.2015 रोजीRW/NH15017/109/2015-P&M (RSCE) या परीपत्रकाद्वारे निकष परिभाषित केले आहेत. या परिपत्रकानुसार, रस्ते अपघातातील ब्लॅक-स्पॉट म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 500 मीटर लांबीचे असे भाग आहेत जेथे मागील 3 वर्षांमध्ये 5 रस्ते अपघात (सर्व तीन वर्षात मिळून मृत्यू/गंभीर जखमा यांचा समावेश असलेले अपघात) झाले आहेत, अथवा मागील 3 कॅलेंडर वर्षांमध्ये 10 प्राणघातक घटना (सर्व तीन वर्षांत एकत्रितपणे) झाल्या आहेत,अशा जागा आहेत.राज्य सरकारांच्या पोलिस विभागांनी गोळा केलेल्या आणि या मंत्रालयाच्या परिवहन संशोधन विंग (TRW) द्वारे संकलित केलेल्या रस्ते अपघातांच्या डेटाच्या आधारे, या ब्लॅकस्पॉट्सच्या ठिकाणी अपघात कमी करण्यासाठी तातडीने करण्याच्या अल्पकालीन उपाययोजना आणि कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जातात.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,राष्ट्रीय महामार्ग आणि संरचना विकास निगम लिमिटेड, (NHAI,NHIDCL) आणि राज्य परिवहन महामंडळ (PWD) च्या राष्ट्रीय महामार्ग शाखा यांच्या अंमलबजावणी एजन्सींनी सल्लागार कंपनीसोबत केलेल्या कराराच्या तरतुदींनुसार खराब प्रकल्प तयार करणे आणि पर्यवेक्षणाचा अभाव यासाठी डीपीआर सल्लागार, प्राधिकरण अभियंता आणि स्वतंत्र अभियंता यांच्यावर कारवाई केली जाते. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये टीम लीडर/मुख्य कर्मचाऱ्यांची बदली, दंड आकारणे आणि विशिष्ट कालावधीसाठी कंपनी/मुख्य कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित करणे या बाबी समाविष्ट आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/ S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com