अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती

Posted On: 14 MAR 2022 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 14 मार्च 2022

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय बौद्ध, ख्रिस्ती, जैन, मुस्लीम, पारसी आणि शीख या सहा अधिसूचित अल्पसंख्याक समुदायांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी पुढील शिष्यवृत्ती योजना राबवत आहे:

(i) मॅट्रिक-पूर्व शिष्यवृत्ती योजना (इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी)- ज्या विद्यार्थ्यांच्या जन्मदात्या किंवा कायद्याने संमत पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीने आधीच्या वर्गातून उत्तीर्ण होताना किमान 50% गुण मिळविलेले असतील असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

(ii)मॅट्रिक-पश्चात शिष्यवृत्ती योजना (इयत्ता 11 वी ते पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या तसेच तंत्रज्ञानविषयक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 11 वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी)- ज्या विद्यार्थ्यांच्या जन्मदात्या किंवा कायद्याने संमत पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीने आधीच्या वर्गातून उत्तीर्ण होताना किमान 50% गुण मिळविलेले असतील असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

(iii) गुणवत्ता आणि साधन आधारित शिष्यवृत्ती योजना-( योग्य अधिकारप्राप्त संस्थेकडून मान्यता मिळविलेल्या शिक्षणसंस्थेत पदवी-पूर्व तसेच पदवी-पश्चात पातळीवर तंत्रज्ञानविषयक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)- ज्या विद्यार्थ्यांच्या जन्मदात्या किंवा कायद्याने संमत पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीने आधीच्या वर्गातून उत्तीर्ण होताना किमान 50% गुण मिळविलेले असतील असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

(iv) बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना - ही अल्पसंख्याक समाजातील नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त मुलींसाठीची शिष्यवृत्ती योजना आहे. ज्या विद्यार्थिनींच्या जन्मदात्या किंवा कायद्याने संमत पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्या विद्यार्थिनीने आधीच्या वर्गातून उत्तीर्ण होताना किमान 50% गुण मिळविलेले असतील अशा विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचे श्रेणीनिहाय तपशील आणि वर्ष 2016-17 ते 2020-21 या कालावधीत उपरोल्लेखित योजनांच्या अंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खालील तक्त्यात दिली आहे:

Buddhist

Christian

Jain

Muslim

Sikh

Parsi

Total Scholarships sanctioned

Amount (in Rs. Crore)

741231

3722438

404121

23445123

2540217

4828

30857958

9904.06

 

 

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.


S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805910) Visitor Counter : 1457


Read this release in: English , Urdu , Gujarati , Tamil