नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उडान योजने अंतर्गत 405 विमानतळ

Posted On: 14 MAR 2022 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2022

देशाच्या विविध भागांमधल्या हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला किफायतशीर दरात हवाई प्रवास करणे शक्य व्हावे या उद्देशाने  नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने, प्रादेशिक कनेक्टीव्हिटी योजना- उडान (उडे देश का आम नागरिक ) 21-10-2016 ला सुरु केली.  उडान ही बाजारपेठ लक्षात घेऊन चालणारी योजना आहे. उडान अंतर्गत मार्गात समाविष्ट करण्यात आलेल्या आणि आरसीएस अर्थात प्रादेशिक कनेक्टीव्हिटी योजनेअंतर्गत कार्ये सुरु करण्यासाठी सुधारणा/विकास यांची आवश्यकता लागणाऱ्या विमानतळांचा ‘सेवांचा काहीसा अभाव  असणारे  विमानतळ पुनरुज्जीवन’ योजने अंतर्गत विकास करण्यात येत आहे. याची अंमलबजावणी करणाऱ्या  भारतीय विमानतळ प्राधिकरणाने,उडान अंतर्गत  आरसीएस  उड्डाणाकरिता  154 आरसीएस विमानतळ निश्चित केले असून यामध्ये 14 जल विमानतळ आणि 36 हेलीपॅडचा समावेश आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 948 मार्ग निश्चित केले  असून त्यापैकी  09.03.2022  पर्यंत 405 मार्ग कार्यान्वित झाले आहेत.यामध्ये 65 विमानतळ असून यामध्ये 8 हेलीपोर्ट आणि 2 जल विमानतळांचा समावेश आहे. कमी वर्दळीच्या आणि सेवा काही प्रमाणात कमी असलेले विमानतळ/हेलीपोर्ट/जल विमानतळ यांना
प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहार्यता तफावत निधी बरोबरच केंद्र, राज्य सरकारे आणि विमानतळ ऑपरेटर द्वारे निवडक विमान कंपन्या ऑपरेटरना इतर सवलतीही देण्यात येत आहेत.  

उडान योजनेला 2016 मध्ये सुरवात करताना केंद्र सरकारने, प्रादेशिक कनेक्टीव्हिटी मार्गाअंतर्गत  500 ते 600 किमी अंतरासाठी एका आसनाच्या दरासाठी 2500  रुपयांची मर्यादा घातली होती. उडान योजनेंतर्गत देण्यात आलेल्या सूत्रानुसारच्या निर्देशांकसूचीला अनुसरून ही मर्यादा आहे.

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह ( निवृत्त ) यांनी आज राज्य सभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Patil/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805855) Visitor Counter : 318