सांस्कृतिक मंत्रालय
साहित्योत्सव अर्थात साहित्य अकादमीच्या अक्षर-उत्सवामध्ये आज 24 पुरस्कार विजेत्यांना प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
आदिवासी लेखकांची बैठक या अंतर्गत आज अक्षर-उत्सवामध्ये 24 आदिवासी भाषांचे प्रतिनिधी सहभागी
Posted On:
11 MAR 2022 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2022
साहित्योत्सव म्हणजेच साहित्य अकादमीमार्फत होणारा अक्षरांचा उत्सव हा भारतातील साहित्याचा सर्वात मोठा सर्वसमावेशक उत्सव 10 मार्च 2022 रोजी नवी दिल्लीत सुरू झाला. अक्षर-उत्सव 2022 हा भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्षाच्या संस्मरणार्थ साजरा केला जात आहे.
या उत्सवात आज रविंद्र भवन येथील प्रांगणात 24 आदिवासी भाषांच्या प्रतिनिधींची आदिवासी लेखक बैठक भरवली होती. या बैठकीचे उद्घाटन अखोन असगर अली बशरत या ख्यातनाम बाल्टी कवींच्या हस्ते करण्यात आले.
नंतर संध्याकाळी कोपर्निकस मार्गावरील कमानी सभागृहात 24 पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ख्यातनाम मराठी कवी आणि समीक्षक भालचंद्र नेमाडे या पुरस्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये अनुराधा सरमा पुजारी (आसामी), ब्रात्य बसू (बंगाली), माव्दई गहाई (बोडो), नमिता गोखले (इंग्रजी), यग्नेश दवे (गुजराथी), दया प्रकाश सिन्हा (हिंदी), वली मोहम्मद असीर किश्तवारी (काश्मीरी), संजीव वेरेणकर (कोंकणी), जगदीश प्रसाद मंडल (मैथिली), जॉर्ज ओन्नाक्कूर (मल्याळी), थोकचोम इबोहान्बी सिंग (मणीपुरी), किरण गुरव (मराठी), छबीलाल उपाध्याय (नेपाळी), हृषीकेश मलिक (ओडिया), खालीद हुसेन (पंजाबी), मिथेश निर्मोही(राजस्थानी), निरंजन हंसदा (संथाळी), अर्जुन चावला (सिंधी), अंबई (तामिळ), गोरत्ती वेंकन्ना (तेलुगू), चंदर भान ख्याल (उर्दू), विश्वेश्वरी प्रसाद मिश्रा ‘विनय’ (संस्कृत)
त्यानंतर या अक्षर-उत्सवात सर्व 24 पुरस्कार प्राप्त लेखकांची बैठक 12 मार्च 2022 रोजी रविंद्र भवन प्रांगणात सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. यामध्ये ते त्यांच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींच्या सर्जनात्मक प्रक्रिया विशद करतील. याच दिवशी भारतात 1947 पासून नाटकांची उत्कांती यावर चर्चासत्र होईल. या चर्चासत्राचे उद्घाटन ख्यातनाम नाट्यकर्मी भानु भारती आणि यांच्या हस्ते होईल आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार दुपारी 2.30 वाजता चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवतील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805245)
Visitor Counter : 296