वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
स्टार्टअप परिसंस्थेमध्ये आणि देशाच्या आर्थिक विकासात व्हेंचर कॅपिटलिस्टची भूमिका महत्त्वाची - केंद्रीय मंत्री पियुष गोयल
आयव्हीसीए सरकार, स्टार्टअप्स, बाजारपेठ आणि ग्राहक यांच्यात सुवर्ण सेतू म्हणून काम करू शकते – केंद्रीय मंत्री पियुष गोयल
Posted On:
09 MAR 2022 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितले की, भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये आणि देशाच्या आर्थिक विकासात व्हेंचर कॅपिटलिस्टनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इंडियन व्हेंचर अँड अल्टरनेट कॅपिटल असोसिएशनच्या (IVCA) परिषदेला संबोधित करताना, ते म्हणाले की ते नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देत आहेत आणि नवीन कल्पना समोर आणत आहेत जे महत्वपूर्ण आहे.
गोयल म्हणाले की सरकार, स्टार्टअप्स, बाजारपेठ आणि ग्राहक यांच्यात सुवर्ण सेतू म्हणून आयव्हीसीए योगदान देऊ शकते आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देऊ शकते.
तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीतील शहरांपर्यंत पोहोचण्याचे व्हेंचर कॅपिटल फंड्सना आवाहन करून गोयल म्हणाले की, स्टार्टअप सल्लागार परिषदेने हे मान्य केले आहे की भारताच्या दुर्गम भागात प्रतिभावंतांची खाण आहे. अभिनव संशोधनाच्या पुढील लाटेत देशांतर्गत भांडवल मोठी भूमिका बजावू शकते, असे ते म्हणाले.
गोयल यांनी गुंतवणूकदार आणि भांडवल पुरवठादारांना 4 F(एफ) वर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले:
1 Fostering Innovation & Future Technologies -अभिनव संशोधन आणि भविष्यातील तंत्रज्ञानाला चालना देणे
2. Facilitate mobilisation of domestic capital - देशांतर्गत भांडवलाची जुळवाजुळव करणे
3. Fast tracking self-reliance: An AatmaNirbhar Bharat- स्वयंपूर्णता: एक आत्मनिर्भर भारताला गती देणे
4. Focus on Tier 2, Tier 3 & Tier 4 cities and towns- टियर 2, टियर 3 आणि टियर 4 मधील छोट्या आणि मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित करणे
गोयल म्हणाले की, स्टार्टअप्स अमृतकालमध्ये म्हणजे पुढील 25 वर्षात, जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल तेव्हा निर्णायक भूमिका बजावतील.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804737)
Visitor Counter : 226