PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 08 MAR 2022 7:15PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 179.13 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 49,948
  • Active cases stand at 0.12%
  • Recovery Rate currently at 98.68%
  • 8,055 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,24,06,150
  • 3,993 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.46%)
  • Weekly Positivity Rate (0.68%)
  • 77.43 cr Total Tests conducted so far; 8,73,395 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 8 मार्च 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन कोविड-19 रुग्णांची संख्या 3,993 वर घसरल्याने भारताने आज कोविडविरुद्धच्या लढाईत एक मोठे यश मिळवले आहे.  16 मे 2020 रोजी 3,970 रुग्णसंख्येची नोंद झाली होती. त्यानंतर 662 दिवसांनी भारतात नोंदवली गेलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

भारताने आणखी एक यश मिळवले आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 664 दिवसांनंतर 50,000 च्या खाली आली आहे.  देशात सक्रिय सध्या 49,948 उपचाराधीन रुग्ण आहेत. 14 मे 2021 रोजी 49,219 रुग्णसंख्येची नोंद झाल्यानंतरची ही सर्वात कमी संख्या आहे.

देशातील चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढत आहे.  भारताने गेल्या आठवड्यात सरासरी 8.5 लाख  चाचण्या घेतल्या आणि साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 0.68% इतका झाला आहे.

भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड 19 महामारीविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व “संपूर्ण सरकार” या दृष्टिकोनातून करत आहे.  लसीकरण हा महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन (चाचणी, माग काढणे, उपचार आणि कोविड योग्य वर्तनासह) केन्द्र सरकारच्या पंचसूत्री धोरणाचा अविभाज्य घटक आहे.  केन्द्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड 19 चे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी आपले प्रयत्न सातत्याने वाढवत आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804079) Visitor Counter : 162


Read this release in: English , Hindi , Manipuri , Punjabi