अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

नीती आयोगाच्या सहकार्याने दिपमतर्फे उद्या अर्थसंकल्प पश्चात उच्चस्तरीय सल्लाविषयक वेबिनारचे आयोजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेबिनारच्या उद्घाटनपर सत्राला संबोधित करतील

केंद्र सरकारची 22 मंत्रालये आणि विभाग यांच्यातील अधिकारी, नीती आयोग, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सरकारी संघटना यांच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ सदस्य, जागतिक गुंतवणूकदार निधी, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि कायदे या क्षेत्रांतील तज्ञ व्यक्ती असे महत्त्वाचे भागधारक या वेबिनारमध्ये भाग घेतील

Posted On: 08 MAR 2022 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मार्च 2022

 

दीपम अर्थात गुंतवणूक आणि सरकारी मालमत्ता व्यवस्थापन विभाग, नीती आयोगाच्या सहकार्याने उद्या 9 मार्च 2022 रोजी अर्थसंकल्पपश्चात उच्चस्तरीय सल्लाविषयक वेबिनारचे आयोजन केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेबिनारच्या उद्घाटनपर सत्राला संबोधित करतील आणि त्यानंतर कार्यक्रमातील चर्चेला सुरुवात होईल. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किसनराव कराड हे देखील या वेबिनारमध्ये उपस्थित राहणार आहेत. वेबिनारच्या समारोप सत्रात केंद्रीय अर्थमंत्र्यांचे भाषण होईल.

या वेबिनारच्या आयोजनातून भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी आणि अधिक उत्तम परिणाम साधण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण अथवा निर्गुंतवणूक आणि गाभा आणि बिगर गाभा प्रकारच्या मालमत्तांमधून उत्पन्न मिळवणे यांच्याशी संबंधित काल मर्यादित अंमलबजावणी योजना किंवा धोरण आखण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञ, गुंतवणूक समुदाय आणि इतर सन्माननीय भागधारक यांच्याकडून त्यांचे दृष्टीकोन आणि नव्या कल्पना समजून घेण्याच्या उद्देशाने दिपमने या वेबिनारचे आयोजन केले आहे.

या वेबिनारमध्ये केंद्र सरकारची 22 मंत्रालये आणि विभाग यांच्यातील अधिकारी, नीती आयोग, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सरकारी संघटना यांच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ सदस्य, सरकारी निधींमधील वरिष्ठ व्यवस्थापन आणि गुंतवणूक समुदाय, खासगी इक्विटी, जागतिक निवृत्तीवेतन निधी, गुंतवणूकदार बँका, बांधकाम, पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित मालमत्ता चलनीकरण कंपन्या आणि कायदेविषयक तज्ञांसह उत्तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आशिया आणि अतिपूर्वेकडील देश तसेच ऑस्ट्रेलिया येथून महत्त्वाचे भागधारक सहभागी होतील.

वेबिनारच्या संकल्पना खालीलप्रमाणे आहेत:

  1. खासगीकरण आणि निर्गुंतवणूक
  2. गाभा आणि बिगर गाभा प्रकारच्या मालमत्तांचे मालमत्ता चलनीकरण

भारत सरकारचे खासगीकरण, मालमत्ता चलनीकरण तसेच निर्गुंतवणूक कार्यक्रम अधिक तीव्रतेने राबविण्यासाठीचे मजबूत धोरण तयार करताना दिपम संस्था या वेबिनारमध्ये सहभागी झालेले विषय तज्ञ आणि इतर सहभागी यांनी व्यक्त केलेले मौल्यवान विचार आणि अनुभव यांचा त्यात समावेश करणार आहे.


* * *

R.Aghor/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804065) Visitor Counter : 203