राष्ट्रपती कार्यालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश
Posted On:
07 MAR 2022 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2022
दरवर्षी 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे:-
“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांचे अभिष्टचिंतन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.
आज सातत्याने जग बदलत असताना, भारतीय महिला त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात तसेच राष्ट्रीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडत आहेत. आपल्या देशाच्या विकास प्रक्रियेतही त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना सक्षम करणे महत्त्वाचे आहे. हे त्यांना त्यांचे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्याप्रति असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम करेल.
महिलांची सुरक्षा, सन्मान आणि प्रगती सुनिश्चित करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्याचा देखील हा दिवस आहे. आपण आपल्या भगिनी आणि मुलींना त्यांच्यातील क्षमता ओळखण्याची संधी दिली पाहिजे आणि अशाप्रकारे राष्ट्र उभारणीत योगदान दिले पाहिजे.
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803650)
Visitor Counter : 228