परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युक्रेनमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या भारतीयांच्या पहिल्या तुकडीचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले स्वागत

Posted On: 26 FEB 2022 9:24PM by PIB Mumbai

 

मुंबई, 26 फेब्रुवारी 2022

युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या भारतीयांच्या पहिल्या तुकडीचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज स्वागत केले. आज संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे AIC 1944 हे विमान पोहोचले. हे विमान, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट च्या हेनरी कोएंदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन, 219 प्रवाशांना घेऊन निघाले होते, या प्रवाशांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत.

युक्रेनमधून, मुंबईत सुखरूप परत आलेल्या या सर्व भारतीय बांधवांच्या चेहऱ्यावर हे हसू बघून खूप आनंद होत आहे, अशी भावना पीयूष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.

तिथून परत आलेल्या सर्वांनी युक्रेनमधील आपल्या मित्रांशी संवाद कायम ठेवावा, असा सल्ला गोयल यांनी या प्रवाशांना दिला, तसेच, त्यांना काहीही काळजी न करण्याचे आवाहनही केले. सर्व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार मिशन मोडवर काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाशी चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेत, तिथे असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला, असेही गोयल म्हणाले. सर्व भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात मदत करण्याचे आश्वासन रशियानेही दिले आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

गोयल म्हणाले विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखीही विमाने पाठवली जाणार आहेत, आणि दुसरे विमान रविवारी पहाटे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.

गोयल यांनी देशाविषयी दाखवलेल्या समर्पणासाठी एअर इंडियाचे मनापासून आभार मानले. घरी परत येणाऱ्या प्रवाशांनी एअर इंडियाचे आभार मानले आहेत.

घरी येणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आणखी छायाचित्रे येत आहेत,)

***

PIB Mum/MD/S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801483) Visitor Counter : 286


Read this release in: Urdu , English , Hindi