राष्ट्रपती कार्यालय
मुघल उद्यान 16 मार्च, 2022 पर्यंत सामान्य लोकांसाठी (देखभाल करण्यासाठी सोमवार आणि 1 मार्च, 2022 रोजी- राजपत्रित सुट्टीचा दिवस वगळता) रोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत (शेवटचा प्रवेश 4.00 वाजता) खुले राहणार
Posted On:
25 FEB 2022 9:22PM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवनाच्या परिसरात असलेले नयनरम्य मुघल उद्यान सामान्य लोकांना पाहण्यासाठी काही काळासाठी मुक्त करण्यात आले आहे. यानुसार तासांच्या सात पूर्व आरक्षित वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत या उद्यानामध्ये जाता येणार आहे. यासाठी शेवटच्या प्रवेशाची वेळ सायंकाळी 4.00 असणार आहे. या प्रत्येक स्लॉटमध्ये एकावेळी जास्तीत जास्त 300 व्यक्ती समावू शकतात. मुघल उद्यानामध्ये येणा-या लोकांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी त्यांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असून मास्क न वापरणा-या व्यक्तींना प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही.
नागरिकांनी मुघल उद्यानात प्रवेश करण्यासाठी पुढील संकेतस्थळावरून आरक्षण करावे.
https://rashtrapatisachivalaya.gov.in किंवा https://rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून आरक्षणाशिवाय थेट प्रवेश देण्यात येणार नाही.
राष्ट्रपतीं भवनाला लागून असलेल्या नॉर्थ अॅव्हेन्यूच्या प्रवेशव्दार क्रमांक 35 मधून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे तसेच तिथूनच त्यांना बाहेर पडता येणार आहे.
***
R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801215)
Visitor Counter : 190