कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जगत अॅग्रो कमोडीटीज प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित  गैरव्यवहार प्रकरणी, एसएफआयओ कडून सतीश कुमार पावा, सौरव अग्रवाल, सुहास परांजपे यांना अटक

Posted On: 25 FEB 2022 8:32PM by PIB Mumbai

 

जगत अॅग्रो कमोडीटीज प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी, एसएफआयओ म्हणजे गंभीर गुन्हे तपास कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक सतीश कुमार पावा, प्रवर्तकांचा मुलगा सौरव अग्रवाल आणि वैधानिक लेखापाल सुहास परांजपे यांना अटक केली आहे.

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाच्या आदेशानुसार हा तपास करण्याची जबाबदारी एसएफआयओकडे दिली होती. 

कंपनी कायदा, 2013 मधील कलम 212(8) अंतर्गत, देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत, एसएफआयओ ने ही अटकेची कारवाई केली आहे. या तपासादरम्यान आढळलेल्या कागदपत्रांवरुन, असे लक्षात आले की हे तिघेही गंभीर कॉर्पोरेट घोटाळ्यात संलिप्त असून कंपनी कायद्याच्या कलम 447 अंतर्गत, ते दोषी आढळले आहेत. गेली तीन वर्षे, हे तिघेही, कंपनीच्या  वित्तीय स्थितीविषयीची बनावट कागदपत्रे तयार करत होते. यात, शेयरबाजारातील त्यांची स्थिति उत्तम असल्याचे दाखवत, बँकांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत होते. अशी बनावट कागदपत्रे दाखवून या तिघांनी स्टेट बँक ऑफ पटियाला- SBoP आणि पंजाब नॅशनल बँक -PNB अशा सार्वजनिक बँकांकडून कर्ज मिळवले आणि ते पैसे वेगवेगळ्या मार्गांनी इतरत्र वळवले असल्याचे आढळले आहे.

या तिघांनाही दिल्लीत अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करत, त्यांची तात्पुरती कोठडी घेण्यात आली.जेणेकरुन त्यांना मुंबईतीळ विशेष न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकेल. 

मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर या तिघांना हजर केले असता, त्यांना अतिरिक्त स्त्र् न्यायालयाने,  1 मार्च 2022 पर्यंत एसएफआयओच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801201) Visitor Counter : 202


Read this release in: English , Urdu , Hindi