ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भरड धान्याचे वैभव परत आणल्यामुळे देश अन्न, पोषण आणि अर्थव्यवस्था या 3 क्षेत्रात आत्मनिर्भर होईल : पियुष गोयल
Posted On:
24 FEB 2022 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2022
भरड धान्यावर लक्ष केंद्रित करून भारत योगशास्त्रासारख्या आपल्या प्राचीन परंपरांकडे पुन्हा वळत आहे असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले. गोयल म्हणाले, “भरड धान्याचे वैभव परत आणल्यामुळे देश अन्न, पोषण आणि अर्थव्यवस्था या 3 क्षेत्रात आत्मनिर्भर होईल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या कृषी क्षेत्रावरील सकारात्मक परिणामांबाबत पंतप्रधानांच्या भाषणानंतर, गोयल यांनी ‘स्मार्ट शेती : भरड धान्याचे वैभव परत आणणे; खाद्यतेलात स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेने वाटचाल’ या विषयावरील वेबिनारला संबोधित केले.
भारताला भरड धान्याचा प्रमुख निर्यातदार बनवण्यासाठी त्यांनी पुढील चार मंत्र दिले. “1) भरड धान्यावर लक्ष केंद्रित करून पिकांमध्ये विविधता आणण्यासाठी कर्नाटकच्या फळांच्या यशस्वी मॉडेलचे अनुकरण राज्ये करू शकतात, 2) भरड धान्यच्या जैव सुरक्षेत गुणवत्ता आणि मदत सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी कृषी स्टार्टअपबरोबर सहकार्य, 3) कुटुंबात भरड धान्याचे आरोग्यदायी आणि पोषण संबधी फायद्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अभियानांचा प्रारंभ, आणि 4) ब्रँड इंडिया मिलेट्सला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संपर्क व्यवस्था ”
भारत सर्व 9 प्रकारच्या भरड धान्याचे उत्पादन करतो यावर भर देताना भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि भरड धान्याचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे याकडे लक्ष वेधले.
केंद्र सरकारचे प्रयत्न अधोरेखित करत ते म्हणाले की, 10 राज्यांतील 100 जिल्ह्यांमध्ये सुमारे 4 लाख हेक्टर भातशेतीचे क्षेत्र तेलबिया लागवडीसाठी वापरले जाणार आहे. तसेच, तेलबियांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारे 230 जिल्हे निवडण्यात आले आहेत. पुढील 5 वर्षांत जवळपास 20 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांच्या आंतरपिकाखाली आणले जाईल.
कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव (DARE) आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) चे महासंचालक डॉ. टी. मोहपात्रा यांनी त्यांच्या सादरीकरणादरम्यान सांगितले की, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते म्हणाले की कापणीपश्चात मूल्यवर्धन, देशांतर्गत खप वाढवण्यासाठी आणि भरड धान्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी सहाय्य पुरवले जाईल.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800836)
Visitor Counter : 251