संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय युद्धसराव- 2022 येत्या 25 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होणार

Posted On: 23 FEB 2022 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2022

 

भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय युद्धसराव- मीलन 2022 येत्या 25 फेब्रुवारीपासून, ‘सिटी ऑफ डेस्टीनी’ विशाखापट्टणम इथे सुरु होणार आहे. नऊ दिवसांपेक्षा अधिक दिवस चालणारा हा युद्धाभ्यास दोन टप्प्यात चालणार आहे. बंदरावर होणारा पहिला टप्पा 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आणि सागरात होणारा दूसरा टप्पा 1 ते चार मार्च दरम्यान चालणार आहे. भारतात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. आणि मीलन 22 ही आपल्या मित्र तसेच भागीदार राष्ट्रांसोबत नौदल क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड साध्य करण्याची एक उत्तम संधी आपल्याला मिळणार आहे. मीलन-2022 च्या यंदाच्या युद्धसरावाची संकल्पना “सौहार्द-एकसंधता- सहयोग” अशी असून भारताला एक जबाबदार सागरी शक्ती म्हणून जागतिक पटलावर आपले सामर्थ्य दाखवले जाणार आहे. या युद्धाभ्यासाचे उद्दिष्ट नौदलाच्या कारवायांचे कौशल्य अधिक वाढवणे, उत्तमोत्तम पद्धती आणि परंपरा आत्मसात करणे आणि सागरी क्षेत्रांत, मित्र राष्ट्रांच्या नौदलाशी व्यावसायिक चर्चा करत त्यांच्याकडून सैद्धांतिक शिक्षण घेणे हा ही आहे.

मीलन विषयी :

मीलन (MILAN) हा भारतीय नौदलाने 1995 साली अंदमान आणि निकोबर तळावर सुरु केलेला एक द्वैवार्षिक बहुराष्ट्रीय नौदल युद्धाभ्यास असून, 2001,2005, 2016 आणि 2020 साल वगळता दर दोन वर्षांनी हा युद्धाभ्यास झालेला आहे. 2001 आणि 2016 च्या आवृत्ती आंतरराष्ट्रीय ताफा आढाव्यामुळे तर 2005 सालचा युद्धाभ्यास 2006 साली झाला तर 2004 सालचा अभ्यास त्सुनामीमुळे रद्द करण्यात आला होता.  2020 चा युद्धाभ्यास कोविड मुळे 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.

सुरुवातीला म्हणजे, 1995 साली केवळ चार देश -इंडोनेशिया, सिंगापूर, श्री लंका आणि थायलंड या युद्धसरावात सहभागी झाले होते. मात्र, त्यानंतर, यातळे सहभागी देश आणि युद्धाभ्यासात गुंतागुंतीच्या कवायती वाढतच गेल्या. भारताच्या पूर्वेकडे पहा, या धोरणाला अनुसरून, सुरु झालेल्या मीलन या युद्धसरावाला सुरुवात झाली. प्रदेशात सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी (सागर) या उपक्रमाअंतर्गत, पश्चिम आयओयर  किनारी आयओआर या बेटांवरील राष्ट्रांना यात सहभागी करुन घेतले गेले. यात 2014 पासून सहा प्रादेशिक देशांपासून 18 देशांपर्यंत हा सहभाग वाढला. भारतीय नौदलाने परदेशी मित्रराष्ट्रांसोबतची मैत्री गेल्या दशकभरात अधिकच विस्तारली, त्यानंतर नौदल सहकार्य अधिकच वाढवण्याची गरज वाटायला लागली. त्यासाठी मीलन ची व्याप्ती आणि गुंतगुंतीच्या कवायती, प्रादेशिक आणि  जगातील बिगर प्रादेशिक नौदल युद्धसरावात सहभागी होण्याची आवश्यकता वाटू लागली. व्यापक नौदल सरावासाठी पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेता, हा युद्धसराव, मुख्यभूमीपासून, विशाखापट्टणम इथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण विशाखापट्टणम पूर्व नौदल विभागाचे मुख्यालय इथे आहे.

मीलनचा यंदाचा युद्धसराव

मीलन- 22 च्या या युद्धाभ्यासात आजवरचा सर्वात जास्त 40 पेक्षा जास्त देशांच्या युद्ध नौका आणि उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळांचा सहभाग बघायला मिळेल. या वेळचे मिलन हे 'व्याप्ती आणि गुंतागुंत' या बाबतीत मोठे असेल, ज्यात समुद्रातील सराव, समुद्रावरचे आणि आकाशातील कारवाया आणि शस्त्र चालविणे याचा समावेश असेल. कार्यान्वयनावरील परिषदा सुद्धा घेतल्या जातील, जेथे यात सहभागी होणाऱ्या नौदल अधिकारी/प्रतिनिधींना सामुद्रिक सुरक्षेवर त्यांची मते मांडण्याची संधी मिळेल. उच्चस्तरीय परदेशी प्रतिनिधींमध्ये सर्वोच्च नौदल सेनानी, संस्थांचे प्रमुख, राजदूत आणि त्यांचे समकक्ष यांचा समावेश असेल.


* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800658) Visitor Counter : 1882


Read this release in: Hindi , Tamil , English , Telugu