आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचा कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अधोरेखित करणारा इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेसचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केला प्रकशित


दृढ राजकीय वचनबद्धता आणि हितधारकांमधील समन्वयामुळे ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली: अहवाल

प्रचंड विविधता असूनही असूनही, भारताने राष्ट्रीय संकटाचा सामना तर केलाच त्याचबरोबर भविष्यातील आरोग्य संकटासाठी जगाकरिता रुपरेषाही तयार केली असल्याचे अहवालात अधोरेखित

अनेक स्वदेशी लसी विकसित केल्याने भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची आली प्रचीती : डॉ मनसुख मांडविया

पंतप्रधानांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राज्यांच्या प्रभावी सहकार्यामुळे जगातील सर्वात मोठी कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वी झाली”

Posted On: 23 FEB 2022 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेसचे (इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजी अँड कॉम्पिटिटिव्हनेसच्या जागतिक नेटवर्कचा भाग आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलशी संलग्न)दोन अहवाल प्रकाशित केले . कोविड 19-भारताची लसीकरण यशोगाथा  ' आणि 'भारताचा  कोविड - 19 लसीकरण प्रशासन प्रवास' असे शीर्षक असलेल्या  या अहवालांमध्ये भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसींचा विकास आणि प्रशासनाच्या प्रयत्नांच्या यशात योगदान देणारे महत्त्वाचे  पैलू अधोरेखित केले आहेत.  ज्यामध्ये स्वदेशी लसींचे  उत्पादन  ,कालबद्ध प्रक्रिया आणि मंजुरीसाठी प्रोटोकॉल समाविष्ट आहे ज्यामुळे सुरक्षित  लसीकरण  शक्य झाले. अहवालांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती आणि अनुभव संकलित केले आहेत जे भविष्यातील महामारी व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य समस्यांसाठी उपयुक्त ठरतील.

या प्रसंगी बोलताना डॉ मनसुख मांडविया म्हणाले, “जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम म्हणून भारताने हाती घेतलेल्या भव्य प्रयत्नांचे हे  दस्तावेजीकरण  प्रसिद्ध  करताना मला आनंद होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने  मंजुरी दिलेल्या अनेक स्वदेशी लसींच्या विकासामधून  भारताची वैज्ञानिक क्षमता दिसून येते; प्रभावी देखरेखीच्या माध्यमातून  संसर्गबाधितांचा शोध , चाचणी , उपचार करण्याची क्षमता आणि आपल्या आरोग्यसेवा व्यावसायिकांनी, आघाडीच्या  कामगार आणि नागरिकांनी दाखवलेली एकजुटता,  पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्ये आणि इतर मंत्रालयांच्या सहकार्याने कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वी केली आहे.”

कोविड-19 लसींसाठी पात्र असलेल्या भारतातील बहुसंख्य 1.3 अब्ज लोकांना लस देणे  आणि लसींचे व्यवस्थापन, देशाच्या काही भागांमध्ये  लसीबाबतची टाळाटाळ   दूर करण्याबरोबरच मुक्त आणि न्याय्य वितरण आणि लसीचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारांसोबत काम करणे ही  भारत सरकारसमोरील महत्त्वपूर्ण आव्हाने होती  याची दखल अहवालात घेण्यात आली आहे. भारतासारख्या देशाचा आकार आणि वैविध्य  लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या प्रयत्नांचेही यात कौतुक केले आहे. भारताचा टप्प्याटप्प्याने  लसीकरण कार्यक्रमाचा दृष्टीकोन, ज्यांना सर्वात जास्त गरज आहे अशा लोकसंख्येला प्राधान्य देणे, ज्यामध्ये आरोग्यसेवा व्यावसायिक,आघाडीचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक  आणि आजारी व्यक्ती यांचा समावेश यांचा या अहवालांमध्ये उदाहरणे म्हणून उल्लेख केला आहे.

लसीकरणादरम्यान प्रतिकूल घटनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य संबंधी प्रयत्नांचीही दखल यात घेतली आहे. लसीकरण सत्रांचे डिजिटल वेळापत्रक आणि कोवीन  डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लसीकरणानंतरचे प्रमाणपत्र हे जागतिक सर्वोत्तम पद्धती म्हणून इतर देश भारताकडून शिकू शकतात. सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि सर्व हितधारक आणि भागीदारांचे प्रयत्न यांचाही यात उल्लेख आहे. लसीकरण सत्र गुणवत्ता   लसीकरण प्रक्रियेच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर स्थापन नियंत्रण कक्षांद्वारे शीतगृह साखळी सुविधा  आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन आणि वास्तविक देखरेख आणि प्रतिसाद यांचाही यात अभ्यास करण्यात आला आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800656) Visitor Counter : 248


Read this release in: Telugu , English , Hindi , Manipuri