विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय उपक्रमांना शक्ती देण्यासाठी एनएम-आयसीपीएसच्या माध्यमातून देशभरातील 25 तंत्रज्ञान नवोन्मेषी केन्द्र (हब), नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला देत आहेत चालना
Posted On:
23 FEB 2022 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2022
बहुआयामी सायबर-फिजिकल प्रणालीवर आधारित राष्ट्रीय अभियानाच्या (एनएम-आयसीपीएस) माध्यमातून देशभरात 25 तंत्रज्ञान नवोन्मेषी केन्द्रे (हब,टीआयएच) स्थापन केली आहेत. ती प्रमुख क्षेत्रात राष्ट्रीय उपक्रमांना चालना देण्यासाठी नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना देत आहेत. लोककेंद्री समस्यांसाठी ते अनेक तांत्रिक उपाय शोधून काढत आहेत. अभियानांतर्गत स्थापन केलेल्या अनेक तंत्राधारित आणि तंत्रज्ञान व्यासपीठांनी अनेक क्षेत्रांमध्ये प्रभाव पाडण्यास मदत केली आहे.
या टीआयएच मार्फत 46 नवीन तंत्रज्ञानासह एकूण 496 तांत्रिक उत्पादने विकसित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अशाप्रकारचे पहिलेच इंटरनेट ऑफ थिंग (आयओटी) या उपकरणाचा समावेश आहे. लसींच्या वाहतुकीला दरम्यान ते तापमानावर लक्ष ठेवते. यात कोविड-19 औषधे, रक्ताचे नमुने, अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस उत्पादने आणि प्राण्यांचे वीर्य यांचा समावेश होतो. आयआयटी रोपर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब - एडब्लूअडीएच आणि त्याचे स्टार्टअप स्क्रॅचनेस्ट (ScratchNest) मधील संशोधकांनी हे विकसित केले आहे.
याशिवाय, आयआयटी मुंबई मधील शास्त्रज्ञांच्या चमूने आयआयटी जोधपूर येथील तंत्रज्ञान नवोन्मेषी केन्द्र( हब, टीआयएच) द्वारे समर्थित असलेल्या कोविड-19 (रक्षक) च्या उपचारासाठी कृती, नॉलेज स्किमिंग आणि होलिस्टिक अॅनालिसिस अंतर्गत कोविड-19 ची पडताळणी करण्यासाठी टेपेस्ट्री पद्धत विकसित केली आहे.
व्हॉट्स अॅपवर पाठवलेल्या प्रतिमांच्या आधारे छातीचा एक्स-रे स्पष्ट करण्यात मदत करणारे कृत्रीम बुद्धीमत्ता-चालित व्यासपीठ एआरटीपीएआरकेद्वारे आयआयएससी बंगलोर येथे विकसित केले आहे. एक्स-रे यंत्र उपलब्ध नाहीत अशा डॉक्टरांना कोविड-19च्या जलद तपासणीसाठी याने मदत केली.
आयआयएसईआर पुणे येथे आय-हब क्वांटम टेक्नोलॉजी फाउंडेशन, क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत आहे.
टीआयएचमुळे 13 टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर (टीबीआय), 54 स्टार्ट-अप आणि स्पिन-ऑफ कंपन्या आणि सुमारे 928 रोजगार निर्माण झाल्या आहेत.
* * *
S.Thakur/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800577)
Visitor Counter : 273