गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने फ्रीडम-2 वॉक आणि सायकल चॅलेंज स्पर्धांच्या पुरस्कारांची केली घोषणा
पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईला विविध विभागातले पुरस्कार जाहीर
Posted On:
17 FEB 2022 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2022
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA),आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत, राबवलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून दोन वैशिष्ट्यपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले होते. – फ्रीडम 2 वॉक आणि सायकल चॅलेंज ही स्पर्धा शहरी पातळीवर तर आंतर-शहर फ्रीडम-2 वॉक आणि सायकल चॅलेंज ही नागरिकांसाठीची स्पर्धा आयोजित केली होती. एक ते 26 जानेवारी 2022 दरम्यान या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नागरिकांना उत्साहाने अधिक निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह, या चॅलेंजचा व्यापक उद्देश. लोकांच्या मानसिकतेत आणि जीवनशैलीत दीर्घकालीन बदल घडवून आणणे हा होता. त्यासाठी चालणे आणि सायकलिंग च्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतून प्रत्येक शहरातले चॅम्पियन्स निवडण्यात आले.
या स्पर्धांमधील विजेत्यांना ऑनलाईन पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. यात उत्तम कामगिरी करणारी शहरे आणि शहरातील लोकांची नावे जाहीर करण्यात आली. तसेच देशातील शहरांसमोर सायकल्स4 चेंज, स्ट्रीटस4पीपल आणि ट्रान्सपोर्ट4ऑल अशी नवी उद्दिष्टे 2023 पर्यंत साध्य करण्याचे आव्हानही ठेवले गेले.
मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी अभियानातील वरील उपक्रमात, वाहतूक आणि विकास धोरण संस्था, (ITDP) भागीदार आहे.
2023 साठीची उद्दिष्टे : इंडिया सायकल्स4चेंज, स्ट्रीटस4पीपल आणि ट्रान्सपोर्ट4ऑल आव्हाने
देशाच्या 100 शहरातील लोकांना रस्ते सुरक्षित आनंदी वाटावे आणि आरोग्यदायी सार्वजनिक स्थळ म्हणून सायकल स्नेही शहरे बनविण्यासाठी 2020 मध्ये भारत सरकार ने इंडिया सायकल्स4चेंज आणि स्ट्रीटस4पीपल आव्हान सुरु केले. हे राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण (2006) च्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. या धोरणात रस्त्यांवर फक्त गाड्या ही दृश्य बदलून लोकांसाठीचे रस्ते इतका आमूलाग्र बदल करण्याची योजना आहे. ट्रान्सपोर्ट4ऑल आव्हान 2021 मध्ये सुरु करण्यात आले होते. याचा उद्देश होता शहरे, नागरिक आणि स्टार्टअप्स यांना एकत्र आणून सार्वजनिक वाहतूकीत सुधारणा करुन सर्व नागरिकांच्या गरजा अधीक उत्तमपणे पूर्ण करणे. या आव्हानांच्या माध्यमातून, शहरांनी नागरिकांशी संवाद साधून चालणे आणि सायकल स्नेही रस्ते बनविण्यासाठी, जनतेतून नवोन्मेशी, कमी खर्चीक आणि जलदगतीने अंमलबजावणी करता येण्यासारख्या कल्पना मागविणे हा नवीन मंत्र स्वीकारला आहे.
विजेत्यांच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा:
S.Thakur/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799155)
Visitor Counter : 311