गृह मंत्रालय
केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दिल्ली पोलिसांच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभाला संबोधित केले
केन्द्रीय गृहमंत्र्यांनी दिल्ली पोलिसांच्या परेडचे सलामी स्वीकारली आणि उत्कृष्ट सेवा आणि शौर्यासाठी दिल्ली पोलिसांचे अधिकरी आणि जवानांना पदके देऊन सन्मानित केले
सेवा आणि कर्तव्य भावनेचे जे दर्शन तुम्ही घडवले आहे , ते केवळ दिल्ली नाही तर संपूर्ण देशातील पोलीस दलांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असेल
सर्वात कठीण कर्तव्य पोलीस पार पडतात, आणि देशाची अंतर्गत सुरक्षा सांभाळताना सर्व सीएपीएफ आणि सर्व राज्यांच्या पोलीस दलातले 35,000 जवान शहीद झाले आहेत
Posted On:
16 FEB 2022 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दिल्ली पोलिसांच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभाला संबोधित केले. केन्द्रीय गृहमंत्र्यांनी दिल्ली पोलिसांच्या परेडचे सलामी स्वीकारली आणि उत्कृष्ट सेवा आणि शौर्यासाठी दिल्ली पोलिसांचे अधिकरी आणि जवानांना पदके देऊन सन्मानित केले . अमित शाह यांनी रोहिणी येथे नवनिर्मित उपायुक्त कार्यालय परिसराचे देखील उद्घाटन केले. याप्रसंगी केन्द्रीय मंत्री देव सिंह चौहान, केन्द्रीय गृह सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या संबोधनात केन्द्रीय गृह मंत्री म्हणाले की 75 वर्षे देशाची राजधानी दिल्ली पोलिसांनी ज्याप्रकारे सुरक्षित ठेवली आणि तिथल्या बदलत्या स्वरूपानुसार स्वतःमध्ये बदल केले त्याची झलक आजच्या संचलनात पहायला मिळाली. उत्कृष्ट सेवा आणि शौर्यासाठी पदक विजेत्या दिल्ली पोलीस अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा देताना शाह म्हणाले की कुठल्याही दलातही चांगल्या कामाचे अनुमोदन संपूर्ण दलाचा उत्साह वाढवणारे असते. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या 79 कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली ज्यांनी मागील दोन वर्षात कोरोना काळात जनतेची सेवा करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. सेवा आणि कर्तव्य भावनेचे जे दर्शन तुम्ही घडवले आहे, ते केवळ दिल्ली नाही तर संपूर्ण देशातील पोलीस दलांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले.
केन्द्रीय गृह मंत्री म्हणाले की दिल्ली पोलिसांचा 75 वा स्थापना दिन आहे आणि देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याबरोबरच दिल्ली पोलिसांचे नवे रुपडे आणि स्वरूप देशाच्या जनतेसमोर आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस व्यवस्था स्वातंत्र्य चळवळ पायदळी तुडवण्यासाठी आणि इंग्रजांची राजवट कायम राखण्यासाठी काम करत होती. मात्र स्वातंत्र्यानंतर शांतता, सेवा आणि न्याय या बोधवाक्यासह दिल्ली पोलिसांनी आपल्या कामाला सुरुवात केली.
केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की मागील 8 दशकांमध्ये दिल्ली पोलिसांनी अनेक शिखरे गाठली, कठीण काळात स्वतःला सिद्ध केले आणि सर्व आव्हानांचा स्वीकार करत आपल्या पद्धतीत मोठा बदल केला.
अमित शाह म्हणाले की दिल्ली पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. दिल्ली पोलिसांमध्ये संवेदनक्षमता व्यवस्थापन विभाग स्थापन केला आहे.
केन्द्रीय गृह मंत्री म्हणाले की सर्वात कठीण कर्तव्य पोलीस पार पडतात, आणि देशाची अंतर्गत सुरक्षा सांभाळताना सर्व सीएपीएफ आणि सर्व राज्यांच्या पोलीस दलातले 35000 जवान शहीद झाले आहेत या सर्वांप्रति आपणा सर्वांच्या मनात आदराची भावना असायला हवी.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798839)
Visitor Counter : 280