आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
स्वदेशी तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि विकासात परस्पर सहकार्याच्या शक्यतांची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आरोग्य मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय आणि तंत्रज्ञान विकास मंडळाची बैठक
Posted On:
15 FEB 2022 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत तंत्रज्ञान विकास मंडळाच्या बैठकीमध्ये तंत्रज्ञान विकास मंडळ संशोधन आणि विकास उपक्रमांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि रसायने आणि खते मंत्रालयादरम्यान परस्पर सहकार्य कसे करू शकते याची रूपरेषा मांडणारे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. मनसुख मांडविय म्हणाले, “आत्मनिर्भार भारत या भावनेनुसार संशोधन कार्याला चालना देण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. रसायने क्षेत्राव्यतिरिक्त, आपण औषधनिर्मिती आणि आरोग्य क्षेत्रातील क्षेत्र ओळखली पाहिजेत, जिथे परस्पर सहकार्याने स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि अवलंब करता येईल.
मंडळाच्या कामकाजाचा विस्तार आणि ते अधिक प्रभावी करण्याच्या गरजेवर भर देत डॉ. मनसुख मांडविय यांनी तंत्रज्ञान विकास मंडळाला भारतातील सर्व औद्योगिक समूहांपर्यंत पोहोचण्याची आणि लहान आणि मोठ्या उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना केली. ते म्हणाले की, “तंत्रज्ञान विकास मंडळ त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात कशी मदत करू शकते याबद्दल आपण त्यांना माहिती देऊन शिक्षित केले पाहिजे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेला साकार करण्यासाठी याची देशाला मदत होईल.
या बैठकीत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि रसायने आणि खते मंत्रालयाशी संबंधित संशोधन आणि विकास कामांना चालना देण्यासाठी दोन्ही मंत्रालयांचे विविध विभाग, तंत्रज्ञान विकास मंडळ आणि इतर संबंधितांबरोबर नियमित बैठका घेतील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
तंत्रज्ञान विकास मंडळाविषयी:
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत 1996 मध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यापारीकरण तसेच आयात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञान विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. तंत्रज्ञान विकास मंडळ या उपक्रमांसाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798629)
Visitor Counter : 632