PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 15 FEB 2022 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 15 फेब्रुवारी 2022

  • 173.42 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 4,23,127
  • Active cases stand at 0.99%
  • Recovery Rate currently at 97.82%
  • 82,817 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,17,60,458
  • 27,409 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.23%)
  • Weekly Positivity Rate (3.63%)
  • 75.30 cr Total Tests conducted so far; 12,29,536 tests conducted in the last 24 hours

  #Unite2FightCorona                                                                                    #IndiaFightsCorona

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 44 लाख 68 हजारांहून अधिक (44,68,365) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 173 कोटी 42  लाखांचा (1,73,42,62,440) टप्पा ओलांडला आहे.

गेल्या 24 तासात 82,817 रुग्ण बरे झाले आहेत आणि बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या( महामारीची सुरुवात झाल्यापासून) आता 4,17,60,458 झाली आहे. 

त्यामुळे आता भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.82% झाला आहे. गेल्या 24 तासात 27,409 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,23,127 आहे. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.99% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,29,536 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 75 कोटी 30 लाखांहून अधिक (75,30,33,302) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.%63 आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.23%.इतका आहे.

इतर अपडेट्स :

 

 

 

 S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1798614) अभ्यागत कक्ष : 231