वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पियुष गोयल यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आकारमान, गुणवत्ता आणि रोजगार निर्मिती  सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन केले

Posted On: 13 FEB 2022 10:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, भारताच्या दुर्गम भागात समृद्धी नेण्यात तंत्रज्ञान खूप मोठी भूमिका बजावू शकते.  टेलिमेडिसिनद्वारे आरोग्यसेवा, एज्युटेकद्वारे शिक्षण याप्रमाणे तंत्रज्ञान आपल्याला  मूलभूत सुविधांचे लोकशाहीकरण करण्यास मदत करू शकते असे ते म्हणाले.

उदाहरणार्थ, आपण ओएनडीसी, डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क का बनवत आहोत? लहान किरकोळ विक्रेत्यांचे  संरक्षण व्हावे हा त्यामागचा  विचार आहे. मोठे  ई-कॉमर्स उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत आणि त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत हे ठीक आहे. मात्र लहान किरकोळ विक्रेत्यांना पाश्चात्य जगातल्या विक्रेत्यांप्रमाणे नामशेष होऊ द्यायचे कातिथे  छोटी दुकाने जवळजवळ संपुष्टात आली  आहेत. अशा स्थितीत आपण त्यांच्या उपजीविकेचे रक्षण करायला नको का , असा प्रश्न गोयल यांनी आज आयआयटी कानपुर द्वारा आयोजित धोरण संबंधी  परिषद  2022 ला संबोधित केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 135 कोटी नागरिकांच्या कल्याणाचा विचार करून, आपल्याला @2047 मधील  भारतासाठी एक स्वप्न दिले आहे, ज्याला अमृत काल म्हणतात असे गोयल म्हणाले.

"जोपर्यंत तुमची महत्त्वाकांक्षी लक्ष्ये नसतील, जोपर्यंत तुम्ही  मोठी स्वप्ने पाहणार नाही, जोपर्यंत तुमच्याकडे मोठ्या आशा, आकांक्षा, इच्छा नसतील, तोपर्यंत तुम्ही कधीही महान होऊ  शकत नाही. एक काळ असा होता की आपली लोकसंख्या हा शाप मानला जात होता, मात्र  पंतप्रधान मोदींनी ती  संपूर्ण विचारसरणी बदलून  आपली  तरुण लोकसंख्या ही आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले.  ही मोठी लोकसंख्या आपल्याला  मोठ्या संधी देतेदेशासाठी अतिशय उज्ज्वल भविष्याची दारे खुली करते.  आणि म्हणूनच आपल्याला एक सर्वांगीण दृष्टी आवश्यक आहे ज्यात  सर्व क्षेत्रांमध्ये वाढीची कल्पना असेल.  व्यवसाय करणे सुलभ करेल, अभिनवतासंशोधन, विकास, आधुनिकतेला प्रोत्साहन देईल आणि  कौटुंबिक मूल्ये, आपली संस्कृती यांचा आदर करेल,, जगणे सोपे करेल, ज्याला आपण  प्रत्येक नागरिकासाठी जीवन सुलभता म्हणतो., असे गोयल यांनी आपल्या  भाषणात सांगितले.

गोयल म्हणाले की, भारताचे नियती बरोबरचे  प्रयत्न केवळ इच्छापूर्तीसाठी न राहता त्याचे रूपांतर समृद्धी, प्रगती आणि विकासात व्हायला हवे.  आणि त्या प्रवासात आयआयटी-कानपूर आणि इतर सर्व आयआयटी आघाडीवर असतील,यात  मला  शंका नाही, असे ते म्हणाले.

गोयल यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी भारताचा सुवर्णकाळ उज्वल बनवण्यासाठी पाच सूत्री कृती योजना दिली:

  • तुमच्या सर्व उपक्रमांमध्ये, आकारमान, गुणवत्ता आणि रोजगार  निर्मितीला केंद्रस्थानी ठेवा
  • शेतकरी, कारागीर आणि विणकर, छोटे  किरकोळ विक्रेते इत्यादींसाठी नाविन्यपूर्ण संशोधन  प्रदान करा आणि जगासाठी आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करा
  • डिजिटल प्लॅटफॉर्मचा अभ्यास करा (उदा. सिंगल विंडो, पीएम  गतिशक्ती, ओएनडीसी ) आणि सुविधा वाढवण्यासाठी कल्पना सांगा
  • 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताच्या जी20 अध्यक्षपदासाठी कार्यसूची/संकल्पना निश्चित  करण्यात मदत करा
  • सेवा आणि समर्पण हे आपले मार्गदर्शक तत्वज्ञान बनवा आणि राष्ट्राचे ऋण फेडा

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798160) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu