पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

द मॅंगनीज ओर इंडिया लिमिटेड च्या  निव्वळ नफ्यात ~ 305% वाढ, परिचालित महसूल  33% वाढला;  कंपनीने उत्पादनात नोंदवली 16% ची वाढ

प्रविष्टि तिथि: 13 FEB 2022 5:27PM by PIB Mumbai

 

पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्यूल 'A' मधे येणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (CPSE) मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेड (MOIL), या कंपनीने  दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत गतवर्षीच्या 60.59 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा 245.91 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून  305% वाढ नोंदवली. एमओआयएल (MOIL) लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांतील कंपनीचे आर्थिक परीणाम घोषित होऊन त्यांना मान्यता देण्यात आली.

या बैठकीत त्यांनी 2021-22 या वर्षासाठी अंतरिम लाभांश @ 30% (म्हणजे रु. 3.00 प्रति शेअर) देण्याची शिफारस केली गेली.  कंपनीने 2.50रु.चा अंतरिम लाभांश मागील प्रत्येक वर्षात दिला होता.

कोविड 19 च्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेचा कंपनीच्या परिचालन कार्यावर विपरीत परिणाम होत असूनही, एमओआय एल(MOIL) उत्तम उत्पादन नियोजन आणि विपणन धोरणासह उत्कृष्ट कामगिरी नोंदविण्यात सक्षम ठरली आहे.  या नऊ महिन्यांच्या कालावधीत, कंपनीने कामकाजातून मागील वर्षाच्या  याच कालावधीतील 727.26 कोटी रु.च्या तुलनेत 968.41 कोटी मिळवून  उत्पादनात 16% ची वाढ नोंदवली कारण या कालावधीत मॅंगनीज खनिजाचे उत्पादन 7.41 लाख टनांवरून 8.57 लाख टन इतके वाढले.

यंदा कंपनीने गेल्या चार आर्थिक वर्षांमधील  तिसर्‍या तिमाहीतील सर्वाधिक उलाढाल आणि एकूण उत्पन्न  गाठले आहे.  कंपनीचा निव्वळ नफा रु.  123.88 कोटी असून हा  आर्थिक वर्ष 2019-20 पासूनचा हा  सर्वाधिक तिमाही नफा आहे.

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1798090) आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali