महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंसा आणि छळवणूक यापासून महिलांचे रक्षण करून त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने सुरु केलेले उपक्रम

Posted On: 11 FEB 2022 8:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022

कोविड महामारीच्या सध्याच्या संकटात राष्ट्रीय महिला आयोगाने अन्याय झालेल्या महिलापर्यंत पोहोचून त्यांच्याबाबतीत घडलेल्या हिंसेच्या आणि छळाच्या घटनांची नोंद घेण्यासाठी नवीन उपक्रम सुरु केले आहेत. टाळेबंदीच्या काळात तक्रारी नोंदविण्यासाठी 7217735372  हा व्हॉट्स अप हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला होता. तसेच पीडित महिलांना संबंधित पोलीस अधिकारी, रुग्णालये,कायदेविषयक सेवा पुरविणाऱ्या संस्था तसेच मानसिक समुपदेशन देणाऱ्या संस्था यांच्याशी जोडून देऊन मदत करण्याच्या उद्देशाने  आयोगाने 27 जुलै 2021 रोजी 7827170170 हा अहोरात्र कार्यरत राष्ट्रीय महिला आयोगाचा महिला हेल्पलाईन क्रमांक सुरु केला. या सर्व उपक्रमांमुळे, महिलांना राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार नोंदविणे सोपे झाले आहे. वर्ष 2020 आणि 2021 मध्ये आयोगाकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारींचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.

महिलांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाने या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि पीडित महिलांचे हिंसक घटना आणि छळापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे.यासाठी आयोगाने आलेल्या तक्रारींची सुनावणी ऑनलाईन आणि प्रत्यक्षपणे अशा दोन्ही मार्गांनी सुरु केली आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य/जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याशी समन्वय साधून महिला जन सुनवाई हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प सुरु केला आहे. याशिवाय, छापील, इलेक्ट्रॉनिक आणि इतर माध्यम स्त्रोतांच्या मार्फत उजेडात आलेल्या अशा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा,1990 मधील विभाग 10(1)(फ)अंतर्गत स्वतःहून दखल घेऊन पुढील कारवाई केली आहे.

देशभरात घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा,2005 अंतर्गत नियुक्त संरक्षक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती हाती घेण्यासाठी महिला आयोगाने लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीशी सहयोग संबंध स्थापन केले आहेत. 28 जून 2021 रोजी या कार्यक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले. महिलांशी संबंधित कायद्यांबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी पोलीस संशोधन आणि विकास मंडळाच्या सहकार्याने लिंग समानता कार्यक्रम आणि क्षमता निर्मितीविषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

परिशिष्ट

Data of complaints registered in National Commission for Women under various categories during 2020 and 2021

 

S.No.

State

2020

2021

1

Andaman and Nicobar Islands

4

2

2

Andhra Pradesh

158

206

3

Arunachal Pradesh

6

6

4

Assam

85

90

5

Bihar

1072

1457

6

Chandigarh

52

64

7

Chhattisgarh

154

165

8

Dadra and Nagar Haveli

7

4

9

Daman & Diu

1

1

10

Daman & Diu

3

2

11

Delhi

2636

3336

12

Goa

15

24

13

Gujarat

207

265

14

Haryana

1265

1460

15

Himachal Pradesh

94

135

16

Jammu and Kashmir

79

157

17

Jharkhand

335

454

18

Karnataka

467

538

19

Kerala

145

152

20

Ladakh

0

2

21

Lakshadweep

1

1

22

Madhya Pradesh

877

1105

23

Maharashtra

1188

1504

24

Manipur

7

3

25

Meghalaya

8

7

26

Mizoram

1

3

27

Nagaland

1

1

28

Odisha

138

176

29

Pondicherry

10

14

30

Punjab

420

544

31

Rajasthan

907

1130

32

Sikkim

1

4

33

Tamil Nadu

464

581

34

Telangana

220

238

35

Tripura

6

15

36

Uttar Pradesh

11872

15828

37

Uttarakhand

358

457

38

West Bengal

458

734

Total

23722

30865

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797801)
Read this release in: English , Urdu , Tamil