माहिती आणि प्रसारण मंत्रालय

72 व्या बर्लिन युरोपियन चित्रपट बाजार 2022 मध्ये भारताच्या दालनाचे उद्घाटन

Posted On: 10 FEB 2022 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या  पार्श्‍वभूमीवर,बर्लिन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या वार्षिक चित्रपट बाजार ज्याला ईएफएम किंवा युरोपियन चित्रपट बाजार म्हटले जाते त्यात भारताच्या सहभागाचे आभासी उद्घाटन सत्र संपन्न झाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय (एमआयबी ), राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांनी आयोजित केलेल्या उद्घाटन सत्रात भारताच्या स्वातंत्र्याची  75 वर्षे - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि इतर गोष्टीं दर्शवणाऱ्या भारताच्या दालनाचे आभासी माध्यमातून  अनावरण झाले.

उद्घाटन सत्रात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव डॉ.अपूर्व चंद्रा यांनी दरवर्षी  3000 चित्रपटांची निर्मिती करणारा  जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग म्हणून भारताच्या चित्रपट उद्योगाची प्रशंसा केली. त्यांनी भारताच्या ॲनिमेशन , व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स उद्योगातील विलक्षण कौशल्याचे  कौतुक केले  आणि याला त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानंतर भारताची पुढची मोठी विकास गाथा  म्हणत संबोधले.

जर्मनीतील भारताचे राजदूत पार्वथनेनी हरीश यांनी यावेळी बोलताना, पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात हिमांशू राय यांच्या दिवसांपासून चित्रपट निर्मितीमध्ये भारत -जर्मन सहकार्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल सांगितले.

बर्लिन आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या  कार्यकारी संचालिका  मेरीएट रिसेनबीक यांनी भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असल्याबद्दल अभिनंदन केले.या वर्षी बर्लिन प्रतिभेचा भाग होण्यासाठी निवड झालेल्या भारतातील सात तरुण प्रतिभावान कलाकारांचा विशेष उल्लेख त्यांनी यावेळी केला.

सीआयआय राष्ट्रीय माध्यम  आणि मनोरंजन समितीचे सह अध्यक्ष, भारतीय निर्माता संघाचे अध्यक्ष,  रॉय कपूर फिल्म्स  संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या सत्राचे संचालन केले आणि  अंदाजे 3 अब्ज युरो आकारमानाच्या  भारतीय चित्रपट उद्योगाची पार्श्वभूमी कथन केली. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या  चित्रपट सुविधा कार्यालयाच्या माध्यमातून   (एफएफओ) चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी देण्यात येणाऱ्या  एक खिडकी  मंजुरी संदर्भात  आढावादेखील घेतला.

सीआयआय राष्ट्रीय माध्यम आणि मनोरंजन समितीचे उपाध्यक्ष आणि टेक्निकलरचे भारतातील प्रमुख बिरेन घोष यांनी गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये होत असलेल्या लक्षणीय  बदलाविषयी भाष्य केले. त्यांनी जगभरातील चित्रपट निर्मात्यांना निमिती -पश्चात  आणि आभासी माध्यमातील निर्मिती क्षेत्रासाठी  भारतात येण्यासाठी आमंत्रित केले.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी आणि शुजित सरकार दिग्दर्शित सरदार उधम सिंग,  या दोन हिंदी चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित करणे हे या सत्राचे मुख्य आकर्षण ठरले. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर 18 फेब्रुवारी रोजी बर्लिन मोत्सवात होणार आहे आणि त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे.; सरदार उधम सिंग हा चित्रपट यावर्षी ईएफएम वर प्रदर्शित होणार आहे.

एका भारतीय स्वातंत्र्यसैनिकाची कथा बर्लिन येथे नेल्याबद्दल आणि त्याला एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल  सरकार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय  आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे आभार मानले. या संधीसाठी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलनेही मंत्रालयाच्या  अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि सर्वांना भारतीय दालनामध्ये  चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केले.

भारताच्या दालनामध्ये भारतातील सिनेसृष्टीचा संक्षिप्त आढावा पाहायला मिळतो  आणि  हे दालन भारतात येणार्‍या निर्मात्यांसाठी सुंदर स्थानांची माहिती देते. 17 फेब्रुवारीपर्यंत या दालनातून थेट प्रक्षेपण सुरु राहील. दररोज परिसंवाद सत्रे आणि चित्रपटांचे प्रसारण होईल.

भारताच्या दालनामध्ये  सत्यजित रे यांच्या  निवडक चित्रपटांचे  आणि त्यांच्या जीवनावरील काही माहितीपटांचे  विशेष प्रसारण करत त्यांच्या शंभर वर्षांचे स्मरण देखील केले जात आहे. विविध प्रादेशिक भाषांमधील आठ अन्य भारतीय चित्रपट भारताच्या दालनात दाखवले जात आहेत. यामध्ये आसाममधील दिमासा भाषेतील सेमखोर मराठीमधील  बिटरस्वीट आणि गोदावरी; तमिळमधील कूझनगल; बंगालीमधील कलकोक्खो; तेलुगुमधील नाट्यम; हिंदीमधील  अल्फा बीटा गॅमा  आणि कन्नडमधील  डोल्लू या सिनेमांचा  समावेश आहे. या महोत्सवादरम्यान, भारतीय उद्योग महासंघ  आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय  भारतीय चित्रपटसृष्टीच्या संगीत विश्वावर पार्श्वगायिका म्हणून आठ दशके राज्य केलेल्या, ज्यांचे 6 फेब्रुवारी रोजी मुंबईत वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले त्या भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे.

खालील दुव्यावर क्लिक करून भारताचे दालन आणि चित्रपटांचे प्रसारण पाहता येईल.

https://indiapavilionatberlinale2022.webconevents.com

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797433) Visitor Counter : 244


Read this release in: Hindi , Punjabi , English , Urdu