विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई आणि जेएनसीएएसआर,बंगळुरू येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे समर्थित कार्बन ग्रहण आणि उपयोगावरील दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे

Posted On: 10 FEB 2022 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

भारतात कार्बन ग्रहण  आणि उपयोगासंदर्भातील  (सीसीयू ) दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे  स्थापन केली जात आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने, कार्बन ग्रहण  आणि उपयोगावरील  दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे  (एनसीओई  -सीसीयू ), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि जवाहरलाल नेहरू अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन केंद्र (जेएनसीएएसआर) ,बंगळुरू येथे स्थापन केली जात आहेत.

 ही उत्कृष्टता केंद्रे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सध्याच्या संशोधन आणि विकास  आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे  ग्रहण आणि नियोजन सुलभ करतील त्याचप्रमाणे भागीदारी गट आणि संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी संशोधक, उद्योग आणि भागधारकांचे नेटवर्क देखील विकसित करतील.कार्बन ग्रहण  आणि उपयोगाच्या  क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन आणि अनुप्रयोग-केंद्रित उपक्रमांसाठी ही केंद्रे   बहु-अनुशासनात्मक, दीर्घकालीन संशोधन, डिझाइन विकास, सहयोगी आणि क्षमताबांधणी  केंद्र म्हणून काम करतील.

आयआयटी मुंबई मधील एनसीओई-सीसीयू हे , सीसीयूमधील मधील तंत्रज्ञान सज्जता  तयारी पातळी सुधारण्यासाठी नवीन पद्धती विकसित करण्याबरोबरच भारतातील उद्योग-केंद्रित सीसीयू नवोपक्रमासाठी टप्पे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम परिभाषित करेल.

जेएनसीएएसआर, बेंगळुरू येथील एनसीओई  -सीसीयू हे  संबंधित सामग्री आणि अनोख्या पद्धती विकसित करून कार्बन ग्रहण आणि रूपांतरण विकसित आणि सिद्ध  करण्याचे उद्दिष्ट ठेवेल .हे केंद्र सीसीयू संशोधनाला चालना देईल, प्रशिक्षण आणि सल्ला प्रदान करेल आणि केंद्रातील  संशोधनातील उत्कृष्टतेचे जागतिक आर्थिक आणि सामाजिक प्रभाव असलेल्या उपायोजनांमध्ये रूपांतर करेल.

तीव्र  हवामान कालावधी अंतर्गत, उत्सर्जन कमी करण्याच्या तंत्रज्ञानाचे  योग्य संतुलन निश्चित करणे आणि त्याचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. कार्बन कार्बन ग्रहण  आणि उपयोग (सीसीयू) हा उत्सर्जन कमी करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

 

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797280) Visitor Counter : 198


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada