ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अप्रमाणित प्रेशर कुकरची ऑनलाइन विक्री करणाऱ्या ई-वाणिज्य कंपन्या आणि विक्रेत्यांना बजावल्या 15 नोटिसा

Posted On: 09 FEB 2022 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022  

 

एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या अनुषंगाने , ग्राहकांना इजा किंवा हानी होण्याचा धोका टाळण्यासाठी मानकांचे पालन  आणि मानक चिन्हाचा अनिवार्य वापर करण्याच्या  केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशां अंतर्गत घरगुती प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2020 चे उल्लंघन करून प्रेशर कुकरची विक्री करत असल्याचे आढळून आलेल्या,  ई-वाणिज्य कंपन्यांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने  (सीसीपीए)  नोटिसा जारी केल्या आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.आतापर्यंत अप्रमाणित प्रेशर कुकरची  ऑनलाइन विक्री करणाऱ्या ई-वाणिज्य कंपन्या  आणि विक्रेत्यांना 15 नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

मानकांचे पालन  सुनिश्चित करण्यासाठी आणि निकृष्ट दर्जाच्या  वस्तूंपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी, केंद्र सरकारला भारतीय मानक ब्युरो कायदा, 2016 च्या कलम 16(1) अंतर्गत मानक चिन्हाचा अनिवार्य वापर करण्याचे निर्देश देण्याचा अधिकार आहे. दिशानिर्देश सामान्यतः गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्यूसीईओ ) स्वरूपात प्रकाशित केले जातात. घरगुती प्रेशर कुकरसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश 1 फेब्रुवारी, 2021 रोजी  आणि हेल्मेटसाठी 1 जून, 2021 रोजी लागू झाला आहे.

भारतीय मानक ब्युरोने,  प्रेशर कुकरसाठी असलेल्या  गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल  3 आणि  हेल्मेटसाठी असलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 2 नोटिसा बजावल्या आहेत.

वैध मापन कायदा 2009 अन्वये, अनिवार्य घोषणांच्या  आणि या कायद्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या  उत्पादनाचा मूळ देश, कालबाह्यता तारीख इ. संदर्भातील  नियमांच्या विविध उल्लंघनाविरुद्ध 16.10.2020 ते 03.02.2022 या कालावधीत एकूण 305 खटले दाखल करण्यात आले आहेत, याची माहिती खालील तक्त्यात दिली आहे. 

 

Category of grievance

Number of cases

Country of origin

281

Expiry Date / Best Before

7

Manufacturer / Importer’s Complete Address details

7

Charged More than MRP

7

(Non Standard Units)

1

No declaration of MRP

1

Net Quantity

1

Total

305

 

* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797028) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu