ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजना (ANBS) अंतर्गत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 8 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित केले


राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्याच्या कोणत्याही सार्वजनिक वितरण व्यवस्था योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या स्थलांतरित/अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य वितरित केले गेले

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी एकत्रितपणे अशा गरजूंची संख्या अंदाजे 2.8 कोटी असल्याचे नमूद केले असून भारतीय अन्नधान्य महामंडळ /केंद्रीय साठ्यातून सुमारे 6.4 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उचलले

Posted On: 09 FEB 2022 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले  की, मे 2020 मध्ये 'आत्मनिर्भर भारत पॅकेज' अंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक उपाययोजनांच्या अनुषंगाने, विभागाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आत्मनिर्भर भारत योजना (ANBS) अंतर्गत स्थलांतरित/अडकलेल्या स्थलांतरित व्यक्तींना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्याच्या कोणत्याही  सार्वजनिक वितरण व्यवस्था  योजने अंतर्गत समाविष्ट नसलेल्यांना मे आणि जून 2020 च्या 2 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति व्यक्ती दरमहा 5 किलो प्रमाणे मोफत वाटप करण्यासाठी 8 लाख मेट्रिक टन  अन्नधान्य वितरित केले होते. 

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी एकत्रितपणे अशा सुमारे 2.8 कोटी गरजू व्यक्ती असल्याचे नमूद केले आणि भारतीय अन्नधान्य महामंडळ  /केंद्रीय साठ्यातून सुमारे 6.4 लाख मेट्रिक टन  अन्नधान्य उचलले. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी (तमिळनाडूसह) मे आणि जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीत देशातील सुमारे 2.74 कोटी लोकांना सुमारे 2.74 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे वितरण केले. आत्मनिर्भर भारत योजना अंतर्गत वितरित अन्नधान्याची राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय आकडेवारी परिशिष्ट-I मध्ये दिली आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे  आत्मनिर्भर भारत योजना अंतर्गत उपलब्ध  शिल्लक अन्नधान्य साठा  राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित मासिक एनएफएसए  उचल आणि वितरण अंतर्गत समायोजित/समाविष्ट  करण्यात आला. राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय अशा शिल्लक /समायोजित अन्नधान्याचे प्रमाण दर्शविणारी आकडेवारी   परिशिष्ट-II मध्ये आहे.

आत्मनिर्भर भारत योजना अंतर्गत , सर्व स्थलांतरित / अडकलेल्या स्थलांतरितांना आणि शिधापत्रिका नसलेल्यांना मोफत अन्नधान्य वितरित केले गेले, म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्याच्या कोणत्याही  सार्वजनिक वितरण व्यवस्था  योजने अंतर्गत समाविष्ट  नाही आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना  त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रातीलपात्र गरजू व्यक्तीं ओळखण्याची जबाबदारी देण्यात आली.

Annexure-I

State/UT wise statement showing total quantity of foodgrains distributed under the Atma Nirbhar Bharat Scheme (ANBS), including Tamil Nadu:

 

Sl.

State/UT

Foodgrains distributed by States/UTs under ANBS (in MTs)

1

Andaman & Nicobar Islands

 60

2

Andhra Pradesh

 7

3

Arunachal Pradesh

 799

4

Assam

 15,712

5

Bihar

 86,449

6

Chandigarh

 146

7

Chhattisgarh

 1,964

8

Dadra & NH and Daman Diu

 159

9

Delhi

 4,544

10

Goa

 22

11

Gujarat

 287

12

Haryana

 7,959

13

Himachal Pradesh

 2,028

14

Jammu And Kashmir

 1,958

15

Jharkhand

 717.2

16

Karnataka

 11,600

17

Kerala

 2,142

18

Ladakh

 33

19

Lakshadweep

 15

20

Madhya Pradesh

 1,754

21

Maharashtra

 17,315

22

Manipur

 676

23

Meghalaya

 2,145

24

Mizoram

 250

25

Nagaland

 1,405

26

Odisha

 630

27

Puducherry

 73

28

Punjab

 10,902

29

Rajasthan

 42,478

30

Sikkim

 315

31

Tamil Nadu

 1,449

32

Telangana

 180

33

Tripura

 22

34

Uttar Pradesh

 11,809

35

Uttarakhand

 383

36

West Bengal

 45,894

 

Total

2,74,279

 

Annexure-II

State/UT wise statement showing undistributed ANBS foodgrains adjusted with subsequent NFSA distribution:

 

Sl.

State/UT

Balance (undistributed) foodgrains adjusted under regular NFSA (in MTs)

1

Andaman & Nicobar Islands

 1

2

Andhra Pradesh

 26,816

3

Arunachal Pradesh

 20

4

Assam

 5,870

5

Bihar

 1

6

Chandigarh

 129

7

Chhattisgarh

 144

8

Dadra & NH and Daman Diu

 126

9

Delhi

 2,729

10

Goa

 510

11

Gujarat

 33,294

12

Haryana

 378

13

Himachal Pradesh

 836

14

Jammu And Kashmir

 1,077

15

Jharkhand

 25,653

16

Karnataka

 28,593

17

Kerala

 13,338

18

Ladakh

 1

19

Lakshadweep

 7

20

Madhya Pradesh

 209

21

Maharashtra

 17,194

22

Manipur

 1,781

23

Meghalaya

 -  

24

Mizoram

 418

25

Nagaland

 -  

26

Odisha

 -  

27

Puducherry

 555

28

Punjab

 3,243

29

Rajasthan

 2,122

30

Sikkim

 63

31

Tamil Nadu

 34,285

32

Telangana

 18,982

33

Tripura

 2,461

34

Uttar Pradesh

 1,28,828

35

Uttarakhand

 2,522

36

West Bengal

 14,290

 

Total

 3,66,478

 


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796980) Visitor Counter : 213


Read this release in: English , Urdu , Manipuri , Tamil