वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

थेट परदेशी गुंतवणूक

Posted On: 09 FEB 2022 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

थेट परदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ 2014-15 मध्ये 45.15 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 2020-21 मध्ये 81.97 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढला आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये, भारतामध्ये 339.55 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक नोंदवण्यात आली आहे. या गुंतवणुकीचे आर्थिक वर्षनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहेतः

 

S. No.

Financial Year

Amount of FDI inflows (in US$ billions)

1.

2016-17

60.22

2.

2017-18

60.97

3.

2018-19

62.00

4.

2019-20

74.39

5.

2020-21

81.97

 

थेट परदेशी  गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने गुंतवणूकदार-स्नेही धोरण लागू केले असून या धोरणात बहुतांश क्षेत्रं थेट गुंतवणुकीच्या मार्गाने 100% थेट परदेशी गुंतवणुकीसाठी  खुली आहेत. भारत गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे आणि गुंतवणुकदार स्नेही ठिकाण राहील हे सुनिश्चित करण्यासाठी थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील  धोरणाचा सतत आढावा घेतला जातो. मोठे  उद्योग समूह, संघटना, उद्योग/गटांचे आणि इतर संस्थांचे  प्रतिनिधी यांसारख्या  हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर धोरणात बदल केले जातात. सरकारने अलीकडेच अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या आहेत. केवळ गेल्या एका वर्षात, विमा, संरक्षण, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांमध्ये एफडीआय धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

थेट परदेशी  गुंतवणुकीचा ओघ हा देशांतर्गत गुंतवणुकीत वाढ करतो,सर्व क्षेत्रात आणि पूरक  उद्योगांमध्ये औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देतो. अशा गुंतवणुकीमुळे देशात आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या गोष्टी येतात ज्या  देशाची एकूण आर्थिक वृद्धी आणि विकास होण्याच्या दृष्टीने, कौशल्य विकास, निर्यात प्रोत्साहन आणि अर्थव्यवस्थेची एकूण स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी सहाय्यकारी ठरतात.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री  सोम प्रकाश यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796945) Visitor Counter : 346


Read this release in: English , Urdu