PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 07 FEB 2022 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 7 फेब्रुवारी 2022

  • Over 170 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive

 

  • India's Active caseload currently stands at 11,08,938

 

  • Active cases stand at 2.62%

 

  • Recovery Rate currently at 96.19%

 

  • 1,99,054 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,06,60,202

 

  • 83,876 new cases recorded in the last 24 hours

 

  • Daily positivity rate (7.25%)

 

  • Weekly Positivity Rate (9.18%)

 

  • 74.15 cr Total Tests conducted so far; 11,56,363 tests conducted in the last 24 hours

      

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासांत लसीच्या  14 लाख 70 हजारांहून अधिक (14,70,053) मात्रा देऊन भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने  आतापर्यंत  169 कोटी 63 लाखांहून (169,63,80,755) अधिक मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालांनुसार, 1,88,18,564 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 1,99,054 रुग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,06,60,202 झाली आहे. परिणामी, देशातील कोरोनामुक्तीचा दर 96.19% इतका आहे.

गेल्या 24 तासात 83,876  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 11,08,938 आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.62% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,56,363  चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 74 कोटी 15 लाखांपेक्षा अधिक  (74,15,61,587)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  9.18% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 7.25% नोंदविण्यात आला आहे.

इतर अपडेट्स :

 

S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796320) अभ्यागत कक्ष : 184