कृषी मंत्रालय

प्रधान मंत्री किसान मानधन योजनेची अंमलबजावणी


या योजनेत एकूण 21,86,918 शेतकऱ्यांनी केली नोंदणी

Posted On: 04 FEB 2022 9:57PM by PIB Mumbai

 

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना (SMF) निवृत्तिवेतनाद्वारे सामाजिक सुरक्षा जाळे प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री किसान मान धन योजना (PMKMY) लागू केली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, काही अपवाद कलमांच्या अधीन राहून किमान निश्चित निवृत्ती वेतन 3,000/- रु. रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना एक ऐच्छिक आणि सहयोगी निवृत्तीवेतन योजना आहे, ज्यात वयाच्या 18 ते 40 वर्षापर्यंत सहभागी होता येईल. पात्र लाभार्थी निवृत्तीवेतन निधीचे सदस्यत्व घेऊन योजनेचा सदस्य होण्याचा पर्याय निवडू शकतो. लाभार्थ्याने 29 वर्षांच्या सरासरी प्रवेश वयात दरमहा रु. 100/- योगदान देणे आवश्यक आहे. केंद्र सरकार देखील निवृत्तीवेतन निधीत समान रकमेचे योगदान देते, जो जीवन विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो आणि जे निवृत्तीवेतन देण्यासाठीही जबाबदार असते.

31/01/2022 पर्यंत एकूण 21,86,918 शेतकऱ्यांनी योजनेत नोंदणी केली आहे.

प्रधानमंत्री किसान मान धन योजनेअंतर्गत, पात्र छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, काही अपवाद कलमांच्या अधीन राहून किमान निश्चित निवृत्ती वेतन 3,000/- रु. रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना एक ऐच्छिक आणि सहयोगी निवृत्तीवेतन योजना असल्याने, यात सहभागी होण्याचे वय 18 ते 40 वर्षे आहे, कोणत्याही लाभार्थ्याने निवृत्तिवेतनास पात्र होण्यासाठी अद्याप 60 वर्षे पूर्ण केलेली नाहीत.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795660) Visitor Counter : 242


Read this release in: English , Urdu , Tamil