आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एचआयव्ही/एड्स आणि क्षयरोगाबद्दल जागरूकता मोहीम

Posted On: 04 FEB 2022 6:12PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत सरकारने एचआयव्ही/एड्स, क्षयरोग आणि ऐच्छिक रक्तदान याविषयी जनजागृती मोहिमांचे दोन टप्पे राबवले आहेत.  12 ऑक्टोबर 2021 रोजी एचआयव्ही/एड्स आणि क्षयरोगावरील जनजागृती मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. ही मोहीम एचआयव्ही/एड्स आणि क्षयरोगास प्रतिबंध, तसेच संबंधित सेवांचा प्रचार आणि एचआयव्ही/एड्स आणि क्षयरोगाशी संबंधित कलुषित भावना, भेदभाव कमी करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यातील 25 शाळा आणि 100 महाविद्यालयांसह देशभरातील 834 शाळा आणि 889 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले.  मोहिमेदरम्यान, विद्यार्थ्यांनी चित्रकला, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, फलक तयार करणे, स्वाक्षरी मोहीम, मास्क आणि रील बनवणे या स्पर्धांमध्ये एचआयव्ही/एड्स आणि क्षयरोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भाग घेतला.  महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह राज्यांनी 2021-2022 या वर्षासाठी त्यांना दिलेल्या अनुदानातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवमोहीम राबवली.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795547) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu , Tamil