मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 ‘विश्वासावर आधारित प्रशासन’ या संकल्पनेवर भर देणारा असून हा लोकांचा अर्थसंकल्प आहे: केंद्रीय मंत्री रुपाला
प्रविष्टि तिथि:
04 FEB 2022 5:56PM by PIB Mumbai
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री परषोत्तम रुपाला म्हणाले की, अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने लोकांचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने विकासाच्या प्रक्रियेवरची निष्ठा दाखवून दिली आहे. हा अर्थसंकल्प भारत सरकारचे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचे धोरण, आर्थिक सबलीकरण आणि अर्थव्यवस्था गती मानतेच्या मार्गाने जात आहे, हे सुनिश्चित केले आहे. हा अर्थसंकल्प गरीब, महिला आणि उपेक्षित वर्गासाठीच आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मधे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी अनेक प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत. तथापि, 2022-23 साठी पशुधनाच्या क्षेत्रामध्ये 40% पेक्षा जास्त वाढ आणि केंद्रीय क्षेत्रीय योजनांसाठी 48% पेक्षा जास्त वाढीव निधी वाटप हे सर्वात लक्षणीय आहे. हा अर्थसंकल्प पंतप्रधानांच्या नेतृत्वाअंतर्गत सरकारची वचनबद्धता दर्शवतो, असे मंत्रीमहोदय म्हणाले.
दुग्धव्यवसाय आणि पशुधन क्षेत्रातील योजनांसाठी केलेल्या वाढीव निधीवाटपामुळे भारतातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल, असे ते म्हणाले.
डिजिटल बँकिंग, डिजिटल पेमेंट्स आणि फिनटेक नवकल्पना यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे पशुपालक शेतकर्यांद्वारे दूध खरेदी तसेच इतर खरेदी याची देयके देणे सुरळीत होऊन अधिक पारदर्शकता येईल, आणि पशुधन क्षेत्रात एक चिरंतन परिणाम घडवेल.
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1795530)
आगंतुक पटल : 240