रेल्वे मंत्रालय
रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि दुरुस्ती
Posted On:
04 FEB 2022 4:18PM by PIB Mumbai
रेल्वे मंत्रालय विविध संस्थांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास करत आहे. या व्यवहार्यता अभ्यासाच्या परिणामांच्या आधारे, स्थानके टप्प्याटप्प्याने विकसित करण्यासाठी, विशेषत: प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची स्थानके विकसित करण्याची योजना आहे.पश्चिम रेल्वे अंतर्गत गांधीनगर कॅपिटल (गुजरात) आणि पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत राणी कमलापती रेल्वे स्थानक (मध्य प्रदेश) ही नव्याने विकसित केलेली स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत.दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल (बंगळुरू) हे स्थानक कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहे.
स्थानकाच्या आवारात गर्दीमुक्त विना-अडथळा प्रवेश/निर्गमन, प्रवाशांचे आगमन/निर्गमन यासाठी वेगवेगळी ठिकाणे, अतीगर्दी टाळण्यासाठी पुरेशी प्रशस्त जागा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाकडे एकत्र येण्यासाठी आणि बस, मेट्रो इत्यादींसारख्या वाहतूक व्यवस्थेच्या अन्य सुविधा या विकसित स्थानकामध्ये प्रस्तावित आहेत. अशा प्रकारचा रेल्वे स्थानकांचा विकास हा पहिल्यांदाच करण्यात येत आहे आणि तो जटिल स्वरूपाचा आहे आणि त्यासाठी तपशीलवार तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास आणि शहरी/स्थानिक संस्थांकडून विविध वैधानिक मंजुरी इत्यादींची आवश्यकता आहे.
रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795453)
Visitor Counter : 298