युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल, 2020 ते जानेवारी, 2022 या कालावधीत 78 खेळाडू/माजी खेळाडू/प्रशिक्षक यांना 2 कोटी 54 लाख 03,910 रुपये आर्थिक साहाय्य जारी करण्यात आले:  अनुराग ठाकूर


‘क्रीडापटूंसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी’ योजनेद्वारे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटूंना दिले जाते आर्थिक सहाय्य

प्रविष्टि तिथि: 03 FEB 2022 7:11PM by PIB Mumbai

 

सरकार, 'क्रीडापटूंसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी  (PDUNWFS)' ही योजना राबवत आहे.  उत्कृष्ट खेळाडू, ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे, त्यांना ही योजना वैद्यकीय उपचार, क्रीडा उपकरणांची खरेदी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग यासाठी योग्य आर्थिक सहाय्य पुरवते. हे निधी सहाय्य मागणीवर आधारित आहे आणि अर्जांच्या आधारे पात्र क्रीडापटूंना आर्थिक मदत प्रदान केली जाते. या योजनेंतर्गत, एप्रिल 2020 ते जानेवारी 2022 या कालावधीत 78 खेळाडू/माजी खेळाडू/प्रशिक्षकांना 2 कोटी 54 लाख 03,910 रुपये आर्थिक मदत जारी करण्यात आली आहे. ज्या खेळाडूंनी कोविड संबंधित समस्यांमुळे आर्थिक सहाय्य देण्याची विनंती केली आहे त्यांचाही यात समावेश आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Thakur/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1795186) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Punjabi , Telugu