आदिवासी विकास मंत्रालय
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासींनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विपणनासाठी उचललेली अनेक पावले
Posted On:
02 FEB 2022 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत:
I.मंत्रालय राज्यांना आणि ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाला विविध आदिवासी मेळावे आयोजित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देते, जेणेकरून आदिवासी कलाकार तसेच कारागीर या उत्सवांमध्ये त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करू शकतात. मेळावे तसेच प्रदर्शनांच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांची चित्रकला, हस्तकला आणि कारागिरी, सेंद्रिय उत्पादने यांच्याविषयीचे पारंपारिक कौशल्य प्रदर्शित करता येते. त्याचबरोबर या ठिकाणी आदिवासींचे लोकनृत्य, गाणी, पाककला यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. कोविड महामारीमुळे वर्ष 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांसाठी राज्य सरकारे तसेच ट्रायफेड यांना कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून हे मेळावे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि डिजिटल स्वरूपातील प्रदर्शनांचा पर्याय देखील वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता.
II.स्वतंत्र आदिवासी कलाकार, आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गट, आदिवासींसोबत काम करणाऱ्या संघटना/संस्था/ बिगर-सरकारी संस्था यांचा समावेश असलेल्या आदिवासी पुरवठादारांना काम नेमून देऊन आदिवासी उत्पादनांच्या विपणनासाठी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय, राज्य सरकारे आणि ट्रायफेड यांना निधी देत असते.
III.अगदी दुर्गम आदिवासी भागातील आदिवासी नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या तसेच कारागिरीच्या वस्तू विक्रीसाठी त्यांच्याकडून थेट स्वरुपात मिळविण्यासाठी ट्रायफेड ही संस्था जिल्हा आणि तालुका पातळीवर आदिवासी कारागीर मेळ्यांचे आयोजन करत असते. या उपक्रमातून आदिवासी कलाकारांना प्रदर्शनात येण्याचे आणि त्यांच्या हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रण दिले जाते.
IV.ट्राईब्स इंडिया दुकानांची साखळी, प्रदर्शने, आदी महोत्सव, ऑनलाईन ई-वाणिज्य मंच इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून ट्रायफेड हस्तकलेच्या आणि कारागिरीच्या वस्तूंसह इतर सर्व आदिवासी उत्पादनांच्या थेट विक्रीमध्ये देखील सक्रियतेने सहभागी होत असते.
वर्ष 2015 पासून ट्रायफेडतर्फे आयोजित राष्ट्रीय मेळावे/ उत्सव
|
Year
|
Theme
|
Period
|
Venue
|
|
2015
|
National Tribal Festival-Vanaj
|
13th – 18th February, 2015
|
Indira Gandhi Art and Cultural Centre, New Delhi
|
|
2016
|
National Tribal Carnival – 2016
|
25th – 28th October, 2016
|
Indira Gandhi Indoor Stadium and Pragati Maidan, New Delhi
|
|
2017
|
National Tribal Festival (Aadi Mahotsav)
|
16th – 30th November, 2017
|
Dilli Haat, INA, Central Park, etc, New Delhi
|
|
2018
|
National Tribal Festival (Aadi Mahotsav)
|
16th – 30th November, 2018
|
Dilli Haat, INA, New Delhi
|
|
2019
|
National Tribal Festival (Aadi Mahotsav)
|
16th – 30th November, 2019
|
Dilli Haat, INA, New Delhi
|
|
2021
|
Tribes India ‘Aadi Mahotsav’
|
1st – 15th February, 2021
|
Dilli Haat, INA, New
|
|
2021
|
Tribes India ‘Aadi Mahotsav’
|
16th - 30th November, 2021
|
Dilli Haat, INA, New Delhi
|
केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री रेणुका सिंग सरुता यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1794804)
अभ्यागत कक्ष : 202