ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
ईशान्य प्रदेशासाठी ‘PM-DevINE’ हा विकास उपक्रम घोषित; 1500 कोटी रुपयांची तरतूद
Posted On:
01 FEB 2022 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
केंद्रीय अर्थ आणि कार्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करताना ईशान्य प्रदेशासाठी ‘PM-DevINE’ विकास उपक्रम या नवीन योजनेची घोषणा केली.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की PM-DevINE ची अंमलबजावणी ईशान्य परिषदेच्या माध्यमातून केली जाईल. या नवीन योजनेसाठी सुरुवातीला 1,500 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या अनुषन्गाने पायाभूत सुविधा आणि ईशान्य प्रदेशच्या गरजांवर आधारित सामाजिक विकास प्रकल्पांना या अंतर्गत निधी पुरवला जाईल. यामुळे तरुण आणि महिलांसाठी उपजीविकेची सोय होईल, विविध क्षेत्रातील तफावत दूर करता येईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र सध्याच्या केंद्र किंवा राज्य योजनांना तो पर्याय असणार नाही. केंद्रीय मंत्रालये देखील त्यांचे स्वतःचे प्रकल्प सादर करू शकतात, परंतु राज्यांनी मांडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल.
या योजनेंतर्गत निधी पुरवल्या जाणार्या प्रकल्पांची प्रारंभिक यादी खाली दिली आहे:
INITIAL LIST OF PROJECTS UNDER PM DevINE
S.No.
|
Name of the Project
|
Total tentative cost (Rs. In crore)
|
1
|
Establishment of Dedicated Services for the Management of Paediatric and Adult Haemotolymphoid Cancers in North East India, Guwahati (Multi-State)
|
129
|
2
|
NECTAR Livelihood Improvement Project (Multi-State)
|
67
|
3
|
Promoting Scientific Organic Agriculture in North East Indian (Multi-State)
|
45
|
4
|
Construction of Aizawl By-pass on Western Side
|
500
|
5
|
Gap funding for Passenger Ropeway system for Pelling to Sanga-Choeling in West Sikkim
|
64
|
6
|
Gap funding for Eco-friendly Ropeway (Cable Car) from Dhapper to Bhaleydhunga in South Sikkim
|
58
|
7
|
Pilot Project for Construction of Bamboo Link Road at Different Locations in Various Districts in the State of Mizoram
|
100
|
8
|
Others (to be identified)
|
537
|
|
TOTAL
|
1500
|
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1794381)
Visitor Counter : 283