अर्थ मंत्रालय

धोरणात्मक खरेदीअंतर्गत नीलांचल इस्पात लिमिटेडच्या खाजगीकरणास मंजूरी

Posted On: 31 JAN 2022 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2022

 

वैकल्पिक व्यवस्था म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारामन आणि  केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पीयुष गोयल यांची संयुक्त समिती व आर्थिक व्यवहार मंत्रीगटाने, चार केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि ओदिशा राज्यसरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील दोन उपक्रम यांच्या संयुक्त भागीदार उपक्रमांच्या 12,100 कोटी रुपयांच्या उद्योग मुल्याच्या  समभागांतील 93.71% समभागासाठी मेसर्स टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेडने लावलेल्या सर्वाधिक बोलीस मंजूरी दिली आहे

निलांचल इस्पात मर्यादित (NINL) हा  खनिज आणि धातू व्यापार निगम (MMTC), राष्ट्रीय खनिज विकास निगम (NMDC), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) व मेकॉन (MECON) या चार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि ओदिशा खाण कॉर्पोरेशन (OMC)  व IPICOL या ओदिशा राज्य सरकारी कंपन्या या सर्वांचा संयुकत उपक्रम आहे. निलांचल इस्पात मर्यादित या कंपनीचा ओदिशात कलिंगनगर येथे 1.1 मेट्रीक टनाचा पोलाद प्रकल्प आहे. ही कंपनी मोठ्या तोट्यात सुरू असून हा प्रकल्प 30.3.2020 पासून बंद आहे. कंपनीवर मोठा कर्जभार असून  31.3.2021 रोजीच्या आकड्यांनुसार कंपनीवर 6,600 कोटींहून अधिक देणे आहे. यामध्ये प्रवर्तकांची 4,116 कोटी रुपयांची थकबाकी, 1,741 कोटी रुपयांची बॅंकांची देणी तसेच इतर कर्जदार आणि कर्मचाऱ्यांची देणी यांचा समावेश आहे. कंपनीची एकूण मालमत्ता ऋण 3,487 कोटींची झाली असून 31.3.2021 पर्यंत 4,228 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

भारत सरकारकडे या कंपनीचे समभाग नाहीत. तरीही, सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रमांच्या विक्री समभागधारकांच्या मंडळाने केलेल्या विनंतीवरून आणि ओदिशा राज्यसरकारच्या संमतीने आर्थिक व्यवहार मंत्रीगटाने निलांचल इस्पात मर्यादित (NINL) च्या धोरणात्मक निर्गुंतवणूकीस 8.1.2020 रोजी तत्वतः मान्यता दिली आहे. त्याचबरोबर या व्यवहाराची सुत्रे निर्गुंतवणूक विभाग व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन यांच्याकडे अधिकृतपणे सोपवली आहेत.

हा व्यवहार खुल्या बाजारपेठ तत्वावर झाला असून कंपनीचे उद्योग मूल्य ठरवण्यासाठी स्पर्धात्मक बोली प्रक्रियेतून करण्यात आला. त्यात 31.3.2021 रोजी  असलेल्या कंपनीवर असलेल्या दायित्व रक्कम तसेच कंपनीच्या सहा विक्रेत्या सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रमांकडे असलेल्या 93.71% समभागांचा समावेश आहे.   


* * *

S.Thakur/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794003) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil