कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी भांडवली खर्चात 28.33% वाढ नोंदवली
Posted On:
26 JAN 2022 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2022
कोळसा मंत्रालयाने आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून डिसेंबर, 2021 रोजी संपलेल्या कालावधीत भांडवली खर्चात 28.33% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या . डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीतल्या 9822.28 कोटी रुपयांच्या तुलनेत , कोळसा मंत्रालयाच्या कंपन्यांनी 12605.75 कोटी रुपये भांडवली खर्च करून कोविड प्रभावित अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली. हा भांडवली खर्च कोळसा मंत्रालयाच्या वार्षिक उद्दिष्टाच्या 75% आहे
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
(Release ID: 1792799)
Visitor Counter : 252