वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
प्रकल्प देखरेख गट (PMG) पोर्टलद्वारे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या गतीचा पीयूष गोयल यांनी घेतला आढावा
Posted On:
25 JAN 2022 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022
वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी प्रोजेक्ट मॉनिटरिंग ग्रुप (PMG) अर्थात प्रकल्प देखरेख गट पोर्टलद्वारे देखरेख केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या गतीचा आढावा घेतला. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी अंमलबजावणी करणार्या संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याची गरज मंत्र्यांनी व्यक्त केली.
इन्व्हेस्ट इंडियाचे प्रकल्प देखरेख गट पोर्टल 500 कोटी रुपयांपेक्षा वरच्या गुंतवणुकीसह पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील अडथळ्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्याचे माइलस्टोन-आधारित प्रकल्प निरीक्षण करण्यासाठी एक अद्वितीय संस्थात्मक यंत्रणा आहे. सध्या, प्रकल्प देखरेख गट अंदाजे 48.94 लाख कोटीं रुपयांच्या एकूण अपेक्षित गुंतवणुकीसह 1,351 अंमलबजावणी प्रकल्पांचे निरीक्षण करत आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग, रेल्वे; पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू; नवीन आणि अक्षय ऊर्जा; ऊर्जा यासारख्या पायाभूत सुविधा मंत्रालयांचे प्रकल्प इत्यादी पोर्टलवर सूचीबद्ध आहेत. PMG यंत्रणा प्रकल्प समर्थकांना प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडथळे आणणाऱ्या समस्या संबंधित सरकारी संस्थांकडे मांडण्याची सोय करून देते.
समस्यांचे वेळेवर निराकरण सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालयांसोबत नियमित बैठक घेण्याचे निर्देश कालच्या आढावा बैठकीत, पीयूष गोयल यांनी दिले. 01.04.2021 पासून, 389 समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांसह 22 बैठका आयोजित केल्या आहेत. पीएमजी यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमलबजावणी संस्थांमध्ये समन्वय वाढविला गेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792688)
Visitor Counter : 248