अर्थ मंत्रालय
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
Posted On:
25 JAN 2022 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022
''जीवाची जोखम पत्करून दिलेल्या असाधारणपणे गुणवत्तापूर्ण सेवा" आणि कर्तव्य पार पाडताना प्राप्त केलेली आणि कायम राखलेली उत्कृष्टता यावरील "सेवेतील विशेष प्रतिष्ठित कामगिरी " साठी प्रशंसा प्रमाणपत्रे आणि पदकांचा समावेश असलेल्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी सीमाशुल्क कर्मचाऱ्यांचा विचार केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात.
यावर्षी, 29 अधिकारी/कर्मचाऱ्यांची "सेवेतील विशेष प्रतिष्ठित कामगिरी " साठी प्रशंसा प्रमाणपत्रे आणि पदके प्रदान करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक,राजेश पांडे , वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी,अजित विश्राम सावंत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, पुणे चे अधीक्षक अवधूत बी. खाडिलकर, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, मुंबई चे अधीक्षक एस. वेंकट सुब्रमण्यम, महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे हवालदार सुर्यकांत काशीराम वझे या महाराष्ट्रात कार्यरत पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.
या अधिकाऱ्यांची निवड त्यांच्या संबंधित सेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि दोषविरहित कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांची तपशीलवार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792623)
Visitor Counter : 289