रेल्वे मंत्रालय
दूर अंतरावर असलेल्या औष्णिक उर्जा प्रकल्पांसाठी गाड्या पुरविण्याबाबत रेल्वेकडे निश्चित अशी मार्गदर्शक योजना आहे: रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Posted On:
24 JAN 2022 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2022
रेल्वे गाड्यांच्या वाटपात भेदभाव करण्यात आल्यामुळे खाणींपासून दूर अंतरावर असलेल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांवर परिणाम होत असल्याबद्दल काही माध्यमांकडून प्रसारित अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली होती. या अहवालांमध्ये असे म्हटले होते की, रेल्वेच्या दक्षिण-पूर्व मध्य विभागाने कमी गाड्या उपलब्ध करून दिल्यामुळे, कोळशाची टंचाई निर्माण झाली. परिणामी, महाराष्ट्रात रत्तनइंडिया उर्जा मर्यादित या कंपनीद्वारे संचालित उर्जा प्रकल्प देखील बंद करण्यात आला. दिशाभूल करणाऱ्या या माध्यम अहवालांना रद्दबातल ठरवत रेल्वे मंत्रालयाने याबाबत खालील स्पष्टीकरण जारी केले आहे:
- दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या परिसरात अनेक मोठे औष्णिक उर्जा प्रकल्प आहेत. या प्रकल्पांकडे नव्या कोळसा साठा नियमांनुसार कोळशाचा कमी साठा आहे. यापैकी अनेक कमी अंतरावरील प्रकल्पांमध्ये “टिप्पलर अनलोडिंग सिस्टीम” नावाची यांत्रिक सुविधा उपलब्ध आहे ज्यामध्ये बीओएक्सएन प्रकारच्या माल बाजूच्या दरवाजाने उतरविता येणाऱ्या मोकळ्या वाघिणी आणि “हॉप्पर अनलोडिंग सिस्टीम” नामक सुविधा ज्यामध्ये बीओबीआरएन प्रकारच्या तळाकडून उघडणाऱ्या वाघिणी अशा दोन प्रकारांनी कोळसा उतरविण्याचे कार्य होते.
- हॉप्पर प्रकारच्या गाड्यांमधून प्रत्येक गाडीला 3 तास या वेगाने अत्यंत कमी वेळात माल उतरविता येतो आणि त्यामुळे गाडी रिकामी होऊन जलद रवाना होते. या कमी अंतरावरील प्रकल्पांना हॉप्पर तंत्रामुळे गाड्यांचा पुरवठा अधिक प्रमाणात होत जातो.
- अमरावती ऊर्जा प्रकल्पामध्ये “हॉप्पर अनलोडिंग सिस्टीम” अस्तित्वात नाही. त्यांना कमी गाड्या मिळण्याचे हेच मुख्य कारण आहे.
- दूर अंतरावर असणाऱ्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांनी अंतर्गत खर्च वाचविण्यासाठी एप्रिल ते जून 21-22 या कालावधीत कोळशाच्या पुरवठ्याचे नियमन केलेले आहे. या दूर अंतरावर असणाऱ्या औष्णिक उर्जा प्रकल्पांनी कोळशाच्या पुरवठ्याचे नियमन केल्यामुळे मोठ्या संख्येने रेल्वे गाड्या एका जागी ठप्प झाल्या. उर्जेची मागणी वाढल्यानंतर त्यांच्याकडे असलेला कोळशाचा साठा वापरला गेला.
- केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि केंद्रीय ऊर्जा मंत्रालय यांच्याशी सल्लामसलत करून रेल्वे विभागाने या दूर अंतरावर असलेल्या औष्णिक उर्जा निर्मिती प्रकल्पांना गाड्या पुरविण्यासाठी याआधीच निश्चित अशी मार्गदर्शक योजना आखलेली आहे आणि या प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792310)