इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चिप्स टू स्टार्टअप (C2S) प्रोग्राम अंतर्गत 31 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज पाठवण्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 16 JAN 2022 9:02PM by PIB Mumbai

 

भारताला अर्धसंवाहकांसाठीचे (सेमीकंडक्टर)  प्रमुख केंद्र  म्हणून परावर्तित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेच्या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाने त्यांच्या  चिप्स टू स्टार्टअप (C2S) कार्यक्रमांतर्गत 100 शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास  संस्था, स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

हा कार्यक्रम देशभरातील सुमारे 100 शैक्षणिक संस्था/संशोधन आणि विकास संस्थांमध्ये (आयआयटी, एनआयटीआयआयआयटी, सरकारी/खाजगी महाविद्यालये आणि संशोधन आणि विकास  संस्थांसह) राबविण्यात येईल. स्टार्ट अप्स आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग देखील त्यांचे प्रस्ताव सादर करून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली सी- डॅक (अत्याधुनिक संगणन विकास केंद्र) ही वैज्ञानिक संस्था, या कार्यक्रमासाठी नोडल संस्था  म्हणून काम करेल.

ऑनलाइन अर्ज चिप्स टू स्टार्टअप (C2S) संकेतस्थळावर  31 जानेवारी 2022 पर्यंत खुले आहेत.

इच्छुकांनी चिप्स टू स्टार्टअप पोर्टलवर (www.c2s.gov.in) प्रकल्प प्रस्ताव पोर्टलवर विहित केलेल्या नमुन्यामध्ये  सादर करावेत.

***

S.Bedekar/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1790385) आगंतुक पटल : 349
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu