भारतीय निवडणूक आयोग

गोवा, मणीपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांच्या बैठकीचे आयोजन

Posted On: 14 JAN 2022 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

भारतीय निवडणूक आयोगाने गोवा, मणीपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तैनात करण्यात येणाऱ्या निरीक्षकांना माहिती देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले. या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक 8 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले होते. या बैठकीला 1400 पेक्षा जास्त अधिकारी उपस्थित होते. त्यापैकी 140 अधिकारी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात प्रत्यक्ष उपस्थित होते तर राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातून इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले. आयएएस, आयपीएस, आयआरएस आणि देशातील इतर लेखा सेवांमधील अधिकारी सामान्य, पोलिस आणि खर्च निरीक्षक म्हणून तैनात करण्यात आले आहेत.

या बैठकीमध्ये बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी सुशील चंद्रा म्हणाले की हे निरीक्षक म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचे डोळे आणि कान आहेत आणि या निवडणुका मुक्त, न्याय्य, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हाव्यात यासाठी सर्व मुद्यांवर त्यांची  अतिशय बारकाईने दृष्टी असली पाहिजे. निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारे पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाचे कठोर धोरण अधोरेखित करताना गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, या निरीक्षकांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले.

निवडणुक नियमांच्या उल्लंघनाची माहिती सबंधीताना देण्यासाठी नागरिकांना सक्षम करणाऱ्या आणि त्यामुळे भरारी पथके, देखरेख पथकांच्या माध्यमातून तातडीची कारवाई करण्यासाठी उपयुक्त असलेल्या सी व्हिजिलची पुरेपूर प्रसिद्धी करण्यावर भर देण्याची त्यांनी निरीक्षकांना सूचना केली. निरीक्षकांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रांना भेटी द्याव्यात आणि ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला मतदारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याची खातरजमा करावी असे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1790033) Visitor Counter : 161