संरक्षण मंत्रालय
8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे(सीओआय) प्राथमिक निष्कर्ष
Posted On:
14 JAN 2022 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022
8 डिसेंबर 2021 रोजी एमआय-17 व्ही 5 च्या अपघातासंदर्भात त्रि-सेवा कोर्ट ऑफ इन्क्वायरीने आपले प्राथमिक निष्कर्ष सादर केले आहेत. चौकशी पथकाने या अपघाताच्या सर्वात जास्त संभाव्य कारणाचा शोध घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साक्षीदारांची चौकशी करण्याबरोबरच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची तपासणी केली. या अपघातामागे तांत्रिक बिघाड, घातपात किंवा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची शक्यता कोर्ट ऑफ इन्क्वायरीने फेटाळून लावली आहे. हा अपघात या खोऱ्यात अचानक हवामानात झालेल्या बदलांमुळे हेलिकॉप्टरने ढगांमध्ये प्रवेश केल्यामुळे झाला. या निष्कर्षांच्या आधारे कोर्ट ऑफ इन्क्वायरीने काही सूचना केल्या असून त्याचा आढावा घेतला जात आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790014)
Visitor Counter : 302