संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कल्याणकारी योजनांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सशस्त्र दल ध्वज दिन निधीसाठी 320 कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा केली
Posted On:
14 JAN 2022 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022
संरक्षण मंत्रालयाने दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सशस्त्र दल माजी सैनिक दिनानिमित्त माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी तीन नवीन उपक्रम सुरू केले आहेत. ट्विटच्या मालिकेत,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले की माजी सैनिक कल्याण विभागाने (DESW) कल्याणकारी योजनांसाठी विशेषत: माजी सैनिकांच्या विधवा /अवलंबून असणाऱ्या मुलांसाठी शिक्षण आणि विवाह अनुदान आदी कल्याणकारी योजनांसाठी प्रलंबित अर्जांचा सर्व अनुशेष भरून काढण्यासाठी सशस्त्र दल ध्वज दिन निधी (AFFDF) ला 320 कोटी रुपये वितरित केले आहेत. याचा फायदा माजी सैनिकांच्या 1,66,000 मुले /विधवांना होईल.
अन्य एका घडामोडीत , पुनर्वसन महासंचालनालयाने एप्रिल-डिसेंबर 2021 या वर्षात सरकारी क्षेत्र/सार्वजनिक उपक्रम /बँका आणि खाजगी क्षेत्रातील अलिकडेच निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना सुमारे 7,900 नोकरी संबंधित पत्रे जारी केली, याच कालावधीत 22,000 हून अधिक लोकांना पुनर्रोजगार देण्यात आला. कॉर्पोरेट क्षेत्रात माजी सैनिकांना नव्याने रोजगार उपलब्ध करणे आणि स्वयंरोजगार योजनांद्वारे नोकऱ्या उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
माजी सैनिक कल्याण विभागाने माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी (https://rakshapension.desw.gov.in) कौटुंबिक निवृत्तीवेतन -संबंधित तक्रारींसह निवृत्तीवेतन समस्येचे जलद निवारण करण्यासाठी समर्पित रक्षा पेन्शन शिकायत निवारण पोर्टल देखील सुरू केले. पोर्टल माजी सैनिक कल्याण विभागाद्वारे तक्रारींवर त्वरित प्रक्रिया सक्षम करेल.
पोर्टलद्वारे, अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ई-मेलवर एक एसएमएस आणि ई-मेल पाठवला जाईल, ज्यामध्ये तक्रारीच्या नोंदणीची पुष्टी आणि त्याचा पाठपुरावा घेण्याबाबत सूचित केले जाईल. तक्रारींचे निवारण करण्याचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने अर्जदार अभिप्राय देखील नोंदवू शकतात.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789998)
Visitor Counter : 211