गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या भेटीच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींसंदर्भात सविस्तर अहवाल मागवला
                    
                    
                        
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेत अशा प्रकारची बेफिकीरी अजिबात स्वीकारार्ह नाही आणि या संदर्भात संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाईल- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
                    
                
                
                    Posted On:
                05 JAN 2022 10:40PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पंजाब दौऱ्याच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या त्रुटींबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करून दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, “ पंजाबमध्ये आज सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या उल्लंघनासंदर्भात गृहमंत्रालयाने सविस्तर अहवाल मागवला आहे. सुरक्षा प्रक्रियेबाबत अशा प्रकारचे दुर्लक्ष अजिबात स्वीकारार्ह नाही आणि याबाबत संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाईल.”
 
 
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
 
	
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1787839)
                Visitor Counter : 296