दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राकडून (TEC) ‘ग्राहक इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सुरक्षित ठेवण्यासाठीच्या आचारपद्धती जारी
या मार्गदर्शक सूचनांमुळे ग्राहकांच्या इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणांचे आणि परिसंस्थेचे रक्षण होण्यास मदत तसेच इंटरनेट उपकरणांना असलेला धोक्याचे व्यवस्थापनही शक्य
Posted On:
05 JAN 2022 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
ग्राहकांच्या विविध उपकरणांवरील इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजेच उपकरणांवरील इंटरनेट सेवा एकमेकांशी जोडण्याची व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राने ‘ग्राहकांचे इंटरनेट ऑफ थिंग्ज सुरक्षित ठेवण्यासाठीच्या आचारपद्धती जारी केल्या आहेत. जागतिक निकषांना प्रमाण मानून या सर्वोत्तम पद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमुळे ग्राहकांच्या उपकरणांवरील आणि सिस्टिमवरील इंटरनेट ऑफ थिंग्ज (इंटरनेट जोडणीची यंत्रणा) सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे, त्याशिवाय अशा सिस्टिम्सना असणाऱ्या धोक्याचेही व्यवस्थापन होऊ शकेल. या अहवालाचा उपयोग, आयओटी उपकरणे निर्माण करणाऱ्या कंपन्या, सेवा पुरवठादार/ सिस्टीम एकत्रित करणारे, आणि अॅप विकसित करणाऱ्यांना होऊ शकेल.
इंटरनेट ऑफ थिंग्ज हे आज जगभरात अत्यंत वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान असून एकूण समाज, उद्योगक्षेत्र आणि ग्राहकांसाठी त्यातून अपरिमित संधी निर्माण होत आहेत.
अनेक क्षेत्रात, जसे की ऊर्जा, वाहनउद्योग, सुरक्षा आणि सर्वेक्षण, दूरस्थ आरोग्य व्यवस्थापन इत्यादीसाठी एकमेकांशी जोडलेल्या उपकरणाद्वारे स्मार्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. सेन्सर,दूरसंचार तंत्रज्ञान ( सेल्युलर आणि बिगर सेल्युलर), एआय/एमएल, क्लाऊड/ एज कम्युटिंग इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानामुळे इंटरनेट ऑफ थिंग्जचा अधिक लाभ मिळतो आहे.
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या राष्ट्रीय डिजिटल दूरसंचार धोरण (NDCP) 2018, नुसार, 2022 पर्यंत पांच अब्ज उपकरणांना जोडणारी इको सिस्टिम तयार केली जाणार आहे. म्हणूनच, 2022 पर्यंत, भारतात 5 अब्ज उपकरणे इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे जोडले जाणे अपेक्षित आहे.
लोकांच्या दैनंदिन वापरात असलेली उपकरणे/नेटवर्क्स हॅक करण्याच्या प्रयत्नातून कंपनी,संस्था, देश आणि महत्वाचे म्हणजे लोकांच्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीपासून, शेवटपर्यंत आयओटी व्यवस्था सुरक्षित करणे अतिशय महत्वाचे आहे.
दूरसंचार विभागाच्या अखत्यारीत असलेले दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र आयओटी क्षेत्रात अनेक हितसंबंधी संस्थांसोबत काम करत असून, या विषयावर त्यांनी आतापर्यंत 16 तांत्रिक अहवाल सादर केले आहेत.
(https://tec.gov.in/M2M-IoT-technical-reports)
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787783)
Visitor Counter : 305