वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीचा वस्तू आणि सेवा कर आकारणीचा टप्पा 5% वरून 12% करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अखिल भारतीय वस्त्रोद्योग संघटनेला संबोधित करताना पंतप्रधानांचे आभार मानले
अमेरिका, अरब अमिरात, कॅनडा, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख देशांशी होत असलेल्या परदेश व्यापारसंबंधी करारांमध्ये वस्त्रोद्योग उत्पादनांवर सवलतीच्या दरातील कर लावले जातील याकडे विशेष लक्ष दिले जात आहे- पीयूष गोयल
Posted On:
04 JAN 2022 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022
केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, उद्योग जगत आणि सरकार हे भारताच्या यशोगाथेचे भागीदार आहेत आणि आता, अधिक मोठी आणि धाडसी उद्दिष्ट्ये निश्चित करून भारताने वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवर विजेता म्हणून प्रस्थापित होण्याची वेळ आली आहे.भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशी आभासी पद्धतीने संवाद साधताना, गोयल यांनी देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला कमी काळात 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी वेगाने काम करण्याचे आवाहन केले.
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळाच्या 46 व्या बैठकीत, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीचा वस्तू आणि सेवा कर आकारणीचा टप्पा 5% वरून 12% करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानून, केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की,वस्त्रोद्योग क्षेत्राला मिळालेली ही नववर्षाची भेट आहे.
वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेचा संदर्भ देत ते म्हणाले की या योजनेमुळे मानवनिर्मित धागे आणि तंत्रज्ञानाच्या वापराने निर्मित वस्त्रांच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर भारताची पदचिन्हे अधिक जोमाने प्रस्थापित होतील. ते म्हणाले की, 10,683 कोटी रुपये खर्चाची ही योजना, साडेसात लाख थेट रोजगार निर्माण करेल.
परदेशी व्यापारी करारांच्या माध्यमातून सरकार भारतीय वस्त्रे क्षेत्रासाठी नवे बाजार शोधण्याचा प्रयत्न करत आहे याचा उल्लेख केंद्रीय मंत्र्यांनी केला. अमेरिका,संयुक्त JPS/SC अरब अमिरात, कॅनडा, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख देशांशी होत असलेल्या परदेश व्यापारसंबंधी करारांमध्ये वस्त्रोद्योग उत्पादनांवर सवलतीच्या दरातील कर लावले जातील याकडे विशेष लक्ष दिले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. समर्थ योजनेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, 71 वस्त्र उत्पादक, 10 औद्योगिक संघटना, राज्य सरकारच्या 13 संस्था आणि 4 क्षेत्रीय संघटना, 3 लाख 45 हजार लाभार्थ्यांचे प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाला मदत करण्यासाठी या योजनेत सहभागी झाल्या आहेत.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787535)
Visitor Counter : 253